sfa twitter
Sports

SFA Championship: निर्वाण कैस्थ, आरुष गोरे, साची नागोटकर यांना सुवर्णपदक

SFA Championship News In Marathi: यावर्षी चॅम्पियनशिपमध्ये 790 शाळांमधील 21,000 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.

Ankush Dhavre

SFA चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत युवा खेळाडूंकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. या स्पर्धतील नवव्या दिवशी जलतरण, नेमबाजी आणि ज्युडो हे खेळ पाहायला मिळाले.

या स्पर्धेतील जलतरण क्रीडा प्रकारात पोदार इंटरनॅशनल शाळेतील निर्वाण कैस्थने मुलांच्या वैयक्तिक कॅटेगरीत सुवर्ण पदकाची कमाई केली. तर गोकुळधाम हायस्कूल, गोरेगावच्या रुद्र मोरेने रौप्य पदकाची कमाई केली.

या स्पर्धेतील शूटींग क्रीडा प्रकारात सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या आरुष गोरेने मुलांच्या १४ वर्षांखालील गटातील पीप साईट प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. तर आर्यवीर काळेने रौप्यपदकावर नाव कोरलं.

या क्रीडा प्रकारातील मुलींच्या गटात भायखळा येथील, सेंट अॅग्रेस शाळेच्या साची नागोटकरने सुवर्णपदक पटकावलं. तर ठाकून कॉम्प्लेक्सच्या चिल्ड्रन अकॅडमीच्या अस्मी नेवातियाने रौप्यपदकाची कमाई केली.

ज्युडो क्रीडा प्रकारात १७ वर्षांखालील मुलांमध्ये जे बी पटेल हिंदी विद्यालयाच्या प्रियांशू माळीने सुवर्ण पदकाची कमाई केली. तर परळच्या एसएसआय इंग्लिश शाळेच्या स्वरूप जाधवने रौप्यपदकाची कमाई केली.

मुलींच्या 17 वर्षांखालील गटात, गुरुकुल शैक्षणिक संस्था,घाटकोपर येथील धनिका शेट्टीने सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर आर्य विद्या मंदिर, जुहू येथील आदिती टाकणेने रौप्य पदकाची कमाई केली.

गुणतालिकेत कोण अव्वल?

ही स्पर्धा सुरु होऊन ९ दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, बोरिवली संघ २२ सुवर्ण, २५ रौप्य आणि २९ कांस्य पदकांसह 214 गुणांची कमाई करून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर चिल्ड्रन्स अकादमी, मालाड दुसऱ्या आणि तर विबग्योर रूट्स अँड राइज, मालाड पश्चिम तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT