Serena Williams will retire from tennis with the US Open to be her last tournament. Saam Tv
Sports

Serena Williams : टेनिस सुपरस्टार सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घाेषणा; युएस ओपन जिंकण्यासाठी आतूर

सेरेना महिला टेनिसच्या क्रमवारीत सलग ३१९ आठवडे अव्वल होती.

Siddharth Latkar

Serena Williams : अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams Retires) हिने नुकतीच टेनिस खेळातून निवृत्तीची घोषणा केली. आजपर्यंत 23 वेळा ग्रँड स्लॅम विजेती राहिलेल्या सेरेनाच्या निवृत्तीच्या घाेषणेनंतर तिचे चाहते समाज माध्यमातून तिच्या कारकिर्दीची आठवण काढत छायाचित्रासह व्हिडिओ पाेस्ट करु लागले आहेत.

कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी सेरेनाने निवृत्तीची घाेषणा केल्याचे सांगितले जात आहे. सेरेनाने समाज माध्यमातून तिला निवृत्ती हा शब्द आवडत नसल्याचे नमूद केले आहे. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेसाठी तिची तयारी नव्हती असंही तिने म्हटलं आहे. युएस ओपन जिंकण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करीन असा विश्वास सेरेनाने व्यक्त केला आहे.

सेरेनाने आपल्या एकूण कारकिर्दीत एकेरीत तेवीस वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकाविलं आहे. ही कामिगरी सर्वाधिक मानली जात आहे. सेरेना महिला टेनिसच्या क्रमवारीत सलग ३१९ आठवडे अव्वल होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT