सीमा पूनिया Twitter/ @afiindia
Sports

Tokyo Olympics: 63.70 मीटर थाळी फेकून सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth of Nations) सीमाने कांस्य तसेच 2014 आणि 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतासाठी एक चांगली बातमी आहे. सीमा पुनियाचे (Seema Punia) थाळी फेक खेळामध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठीचे (The Summer Olympics) दार उघडे झाले आहे. भारतासाठी ही अत्यंत भुषणावह गोष्ट आहे. भारताच्या या अनुभवी महिला खेळाडूने पटिया येथे होत असलेल्या आंतरराज्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवली आहे. ऑलिम्पिकसाठी क्वालिफीकेशन मार्क 63.50 मीटर होते मात्र सीमाने 63.70 मीटर थाळी फेकून ऑलिम्पिकमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth of Nations) सीमाने कांस्य तसेच 2014 आणि 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकले होते. 2014 च्या आशियाई स्पर्धेत पूनियाने सुवर्णपदक जिंकले होते. सीमा पूनिया करनाल येथे इंस्पेक्टर आहेत. सीमाने 11 व्या वर्षेापासूनच अ‍ॅथलेटिक्स व्हायचा निर्णय घेतला होता. वयाच्या 17 व्या वर्षी तिने वर्ल्ड ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये थाळी फेक खेळात सुवर्णपदक जिंकले, परंतु हा टप्पा तिच्यासाठी इतका सोपा नव्हता. ती डोपिंगसाठी दोषी आढळली होती. ज्यामुळे तिचे पदक देखील काढून घेण्यात आले होते.

या स्पर्धेत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती दुसरी भारतीय महिला आहे. याच्या आधी राष्ट्रीय विक्रम नोंदविणारी कमलप्रीत कौरने 66.59 मीटर थाळी फेकून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता. काही दिवसांपूर्वीच तिने इंडियन ग्रांड प्रीक्स 4 मध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला होता.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT