Sasha Banks, WWE Saam Tv
Sports

WWE चा निर्णय समजताच सुपरस्टार शाशा बॅंकचे चाहते घायाळ

हा निर्णय दुर्देवी असल्याचे देखील म्हटले जात आहे. मात्र त्यावर शिक्कामाेर्तब न झाल्याने अनेकजण खूष देखील झाले आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली (Sasha Bank Latest News) : डब्ल्यूडब्ल्यूईत अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेली साशा बॅंकला (Sasha Banks) कंपनीने काढून टाकल्याचे वृत्त धडकताच तिच्या चाहत्यांकडून समाज माध्यमातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा निर्णय दुर्देवी असल्याचे देखील म्हटले जात आहे. दरम्यान या निर्णायावर अद्याप शिक्कामाेर्तब झालेला नाही. त्यामुळेअनेकजण खूष देखील आहेत. (sasha banks latest marathi news)

साशा बॅंक (Mercedes Justine Kaestner-Varnado) आणि नाओमी (Naomi) यांनी नुकतेच एका स्पर्धेतून वॉकआउट केले हाेते. त्यावेळीपासून दाेघी चर्चेत राहिल्या आहेत. वाॅकआऊट करताना दोघींनीही डब्ल्यूडब्ल्यूई पंचांकडे (WWE official) आपले टायटल देखील सुपूर्द केले हाेते. डब्ल्यूडब्ल्यूईने दाेघींना अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. आज अचनाक साशाला कंपनीने काढल्याचे वृत्त समोर आले.

साशाबद्दलची बातमी Wrestling Inc च्या राज गिरी यांनी ट्विट करुन दिलीे. राज यांनी साशाला काढल्याची माहिती मला समजली असे म्हटले आहे. परंतु साशाने तशी विनंती केली की WWE कडून निर्णय घेतला गेला याबाबत माहिती नसल्याचे नमूद केले.

Fightful सीन रॉस सॅपने ट्विट करुन याबद्दल त्याच्या स्त्रोताशी बोलले आहे. या निर्णयाबाबत कोणालाही याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राज गिरी यांची सूत्रे खूप चांगली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

साशाने अलीकडेच तिचा लूक बदलला आहे

नेत्ररोग तज्ञ केंद्राने अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम चॅनेलवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यात साशावर PRK शस्त्रक्रिया झाल्याचे उघड झाले आहे. जिथे चाहत्यांची नोंद आहे की बॉसने तिच्या केसांना नवीन केसांचा रंग दिला आहे. काही चाहत्यांनी तर साशाच्या नवीन लूकची तुलना तिच्या NXT वेळी तिच्या लूकशी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रामकुंड परिसरात दाखल

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT