Sarfaraz Khan returns to India’s Test squad for the Sri Lanka series after Sai Sudharsan is ruled out due to injury. saamtv
Sports

श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात दिग्गज क्रिकेटपटूची एंट्री; साई सुदर्शन संघातून का झाला आऊट?

Team India Squad Update: भारतविरुद्ध श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात काही बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात सरफराज खानचा समावेश करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी मोठा बदल करण्यात आला आहे.

  • दुखापतीमुळे साई सुदर्शन मालिकेतून बाहेर पडला आहे.

  • साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली

भारतविरुद्ध श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात सरफराज खानला घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत घोषणा केलीय आहे. दुखापतीमुळे साई सुदर्शन भारतीय संघातून बाहेर पडला होता. तो सध्या बेंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये कम बॅकसाठी प्रयत्न करत आहे.

रविवारी बीसीसीआयने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, "श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून साई सुदर्शन बाहेर पडला आहे. हा डावखुरा फलंदाज बंगळुरू येथील बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मध्ये सराव करत आहे. त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ही दुखापत बरी होत आहे.

बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पुरुष निवड समितीने साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश केलाय. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ गॅलेकडे रवाना होण्यापूर्वी तो कोलंबोमध्ये भारतीय संघात सामील होईल.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त औकाब खान, सराफ खान, सराफ खान, सराफ खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

Maharashtra News Live Update: जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंदणी करा; गडचिरोलीत भव्य ओबीसी मोर्चा

Ramayana Movie Advance Booking: दिवाळीपूर्वीच 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धमाका;  ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यावधींचा टप्पा केला पार

पोलीस कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ४६ अंमलदारांना मिळाली पदोन्नती, सातारा पोलीस दलात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT