सरफराज खानला टीम इंडियासाठी टेस्ट (Sarfaraz Khan Debut) डेब्यू करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या वडिलांचा उर भरून आला. बाप-लेकानं ऐकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यानंतर दोघांनाही अश्रू अनावर झाले. सरफराजला ही संधी कशी मिळाली? त्यानं स्वप्न सत्यात कसं उतरवलं? सरफराजच्या वडिलांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू का मौल्यवान आहेत, यामागील सॉलिड स्टोरी जाणून घ्या. (Sarfaraz Khan Struggle)
टीम इंडियासाठी कसोटी सामना खेळणारा सरफराज ३११ वा खेळाडू ठरला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने त्याला डेब्यू कॅप दिली. यावेळी त्याचे वडील नौशाद खान हे मैदानात उपस्थित होते. लेकाच्या डोक्यावरील कॅप पाहून त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी मैदानातच सर्फराजला कडकडून मिठी मारली. मुलाला मिळालेली कॅप हातात घेतल्यानंतर ते गहिवरले. यासाठी केलेला संपूर्ण संघर्ष या फोटोत दिसतोय.
सरफराजचा जन्म मुंबईतला. त्याचं कुटुंब हे मूळचं उत्तर प्रदेशातील आझमगडचं. त्याचं संपूर्ण आयुष्य आझाद मैदानातच गेलं. कारण त्याचे वडील नौशाद खान हे स्वत: क्रिकेटचे कोच आहेत. मुंबईत ते क्रिकेट अकॅडमी चालवतात.
त्यामुळे सरफराजच्या कोचिंगची सुरूवात ही त्याच्या लहान वयातच झाली. त्याच्या वडिलांनीच त्याला क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं. क्रिकेटचं खुळ त्याच्या अंगात इतकं भिनलं होतं की, तो ४ वर्ष शाळेतच गेला नाही. गणित आणि इंग्रजी या दोन विषयांसाठी त्याला प्रायव्हेट ट्यूशनही लावण्यात आलं होतं.
नौशाद खान यांनी सरफराज आणि त्याचा लहान भाऊ मुशीर खान यालाही क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं होतं. वडिलांच्या कष्टाला सलाम म्हणून सरफराज ९७ नंबरची जर्सी घालतो, असं म्हटलं जातं. कारण त्याच्या मते यात वडिलांचं नाव नौशाद आहे. नौ-९, शाद -७ त्यामुळे तो ९७ नंबरची जर्सी घालतो. (Cricket news in marathi)
आयपीएलमध्ये सरफराज आरसीबी संघाकडून खेळला होता. अनेकवेळा त्यानं मुंबईचं मैदानही गाजवलंय. पण आरसीबी संघाकडून खेळताना त्याच्यावर ओव्हरवेटमुळं टीका करण्यात आली होती. त्यासाठी विराट कोहलीनं त्याला आरसीबीतून काढल्याचंही सांगितलं जातंय. पण २००९ मध्ये सरफराजने हॅरिस शिल्ड ट्रॉफित तब्बव ४३९ धावांनी विक्रमी खेळी केली आणि सगळ्यांनाच आपली दखल घ्यायला त्यानं भाग पाडलं.
क्रिकेट कोचचा मुलगा ते इंडियन क्रिकेट टीम. हा सरफराजचा प्रवास खडतर होताच.. पण त्याने माघार न घेता प्रयत्न सुरु ठेवले आणि भारतीय संघात स्थान मिळवलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.