IND VS AUS
IND VS AUS  Saam Tv
क्रीडा | IPL

IND Vs AUS Squad: सूर्या बाहेर तर संजू आणि सरफराजला मिळणार संधी; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अशी असू शकते टीम इंडिया

Saam TV News

IND Vs AUS Squad: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर - गावसकर ट्रॉफी सुरु आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय निळवत १-० ची आघाडी घेतली आहे.

ही मालिका झाल्यानंतर १७ मार्च पासून ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. लवकरच या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.

या मालिकेसाठी भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सरफराज खानला देखील या मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. (Latest Sports Updates)

संजूचे पुनरागमन तर ईशान होऊ शकतो बाहेर..

बॉर्डर- गावसकर ट्रॉफी नंतर वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. यावर्षी वनडे विश्वचषक स्पर्धेचा थरार हा भारतात रंगणार आहे. त्यामुळे यापुढे होणारी प्रत्येक वनडे मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

काही दिवसांपूर्वी रिषभ पंतचा अपघात झाला होता. त्यामुळे तो आगामी वनडे विश्वचषक स्पर्धा खेळताना दिसून येणार नाही. त्याची जागा भरून काढण्यासाठी संजू सॅमसन हा उत्तम पर्याय असू शकतो.

कारण ईशान किशनला गेल्या काही सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. द्विशतक झळकावल्यानंतर त्याला अर्धशतकही झळकावता आले नाहीये.

सूर्याच्या जागी सरफराज खानला संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादव हा सध्या आयसीसी टी-२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. मात्र वनडेमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलो नाहीये. त्यामुळे त्याच्या जागी आक्रमक फलंदाज सरफराज खानला संधी दिली जाऊ शकते.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा असू शकतो १५ सदस्यीय भारतीय संघ..

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सरफराज खान, केएल राहुल, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मालिक, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकुर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : आनंदाची बातमी! यंदा मान्सून लवकर धडकणार, परिस्थिती अनुकूल

Pune Crime : चोरट्यांनी लांबवीले ७८२ ग्रॅम दागिने; पुण्यातील प्रख्यात डॉक्टरच्या घरात चोरी

वैशाली दरेकरांच्या रॅलीत विवेक खामकरांची दांडी, ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', शिंदे गटाच्या वाटेवर?

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! या १५ खेळाडूंना मिळालं स्थान

Washim Temperature : एप्रिलअखेर वाशीम जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार!

SCROLL FOR NEXT