Sarfaraz khan and dhruv jurel got bcci grade c central contract bcci announced cricket news marathi  twitter
क्रीडा

BCCI Central Contract: कष्टाचं चीज झालं! इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या सरफराज अन् जुरेलला BCCI कडून मोठं गिफ्ट

Sarfaraz Khan And Dhruv Jurel: दरम्यान भारत - इंग्लंड कसोटी मालिका गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

Sarfaraz Khan- Dhruv Jurel BCCI Central Contract List:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआयने) फेब्रुवारी महिन्यात सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली होती. या यादीतून स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तर काही युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान भारत - इंग्लंड कसोटी मालिका गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.

नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. ज्यात सरफराज खान आणि ध्रुव जुरेलसारख्या युवा खेळाडूंनी देखील प्रमुख योगदान दिलं. आता या कामगिरीचं फळ म्हणून दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. नुकताच बीसीसीआयची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या दोघांचाही सी कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यानुसार दोघांनाही वर्षाला १ कोटी रुपये मानधन दिलं जाणार आहे. (Cricket news in marathi)

यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यादीत ३० खेळाडूंचा समावेश होता. मात्र ही यादी आता ३२ वर जाऊन पोहोचली आहे. एकीकडे या यादीत युवा खेळाडूंना प्राधान्य दिलं गेलं आहे. तर दुसरीकडे चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, इशान किशन, युजवेंद्र चहलसारख्या खेळाडूंना बाहेर करण्यात आलं आहे.

पदार्पणात चमकले..

या दोघांनाही इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. या संधीचा दोघांनीही पुरेपूर फायदा घेतला. सरफराज खानने कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी केली. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती.तेव्हा त्याने संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. दरम्यान त्याने ३ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकं झळकावली. तर ध्रुव जुरेलबद्दल बोलायचं झालं तर तो संघ अडचणीत असताना संकटमोचक बनला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT