India Vs England : 'ध्रुव चमकला' रोहितच्या अर्धशतकानं रचला पाया, गिल-जुरेलनं चढवला विजयी कळस; भारतानं इंग्लंडला लोळवलं

India Vs England Test Series: भारत - इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती.
India Vs England Test Series
India Vs England Test SeriesSaamtv
Published On

India vs England 4th Test:

भारत - इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाला (Team India) हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने मिळून ४० धावा जोडल्या. रोहित शर्मा २४ तर यशस्वी जयस्वाल १६ धावांवर नाबाद परतला. चौथ्या दिवशी दोघांनी चांगली सुरुवात केली.

मात्र यशस्वी जयस्वालच्या (Yashaswi) रुपात भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितनेही पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर भारतीय डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) रजत पाटिदारही परतला. गिल आणि जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजा बाद होताच सरफराज खानही खात न खोलता परतल्याने टीम इंडियावर दडपणही आले. मात्र उर्वरित खेळाडूंनी डाव सावरत विजय संपादन केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

India Vs England Test Series
Viral Cricket Video: कॅच घेतल्यानंतर फिल्डरनं बॉल जोरात फेकला, थेट सरफराजच्या डोक्यावर आदळला, पाहा VIDEO

मालिकेत आघाडी...

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपला होता. भारतीय संघ पहिल्या डावात 307 धावांवर आटोपला होता. त्यानंतर इंग्लंडचा डाव 145 धावांवर आटोपला आणि भारतासमोर हे लक्ष्य ठेवण्यात आले. भारतीय संघाने आजचा हा सामना जिंकून मालिकेत 3-1 पुढे आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर. (Latest Cricket News)

India Vs England Test Series
IND vs ENG 4th Test: चौथ्या कसोटीत रोहितचा मोठा कारनामा! असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील १७ वा फलंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com