India vs Pakistan 2017 champions Trophy Final Match (File Photo) social media
Sports

Cricketer Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या कर्णधाराची क्रिकेटमधून निवृत्ती; सलग ११ टी २० मालिका जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

Former Pakistan captain Sarfaraz Ahmed announces retirement : पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने ११ टी २० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

Nandkumar Joshi

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार, सलग ११ टी २० मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम, एकाच कसोटी सामन्यात १० झेल टिपण्याचा विक्रम, २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा आणि १३ वर्षांची कारकीर्द गाजवणारा पाकिस्तानचा सर्वात यशस्वी कर्णधार सरफराज अहमद यानं रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३८ वर्षीय विकेटकीपर - फलंदाज सरफराज पाकिस्तानकडून २०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

सरफराज ५४ कसोटी, ११७ वनडे आणि ६१ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने ६ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात सहा शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. विकेटकीपिंग करताना त्याने ३१५ झेल घेतले आहेत. तर ५६ स्टम्प आउट केले आहेत. कराचीत जन्मलेल्या सरफराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१० मध्ये पदार्पण केले होतं. तो पाकिस्तानकडून २०२३ मध्ये अखेरचा सामना खेळला होता.

सरफराज यानं सर्व फॉरमॅट म्हणजेच ५० वनडे, ३७ टी २० आणि १३ कसोटी अशा १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत पाकिस्तानचं नेतृत्व केले आहे. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने ११ टी २० मालिका जिंकून विश्वविक्रम केला होता.

सरफराजच्या नावावर एक अनोखा विक्रम देखील आहे. एकाच कसोटी सामन्यात १० झेल टिपणारा एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे. त्याने जोहान्सबर्गमध्ये २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध हा कारनामा केला होता. लॉर्ड्सवर वनडे शतक ठोकणारा पाकिस्तानचा पहिला विकेटकीपर आहे. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात त्यानं ही ऐतिहासिक खेळी केली होती.

सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताला मोठा धक्का दिला होता. फायनलमध्ये भारतीय संघाविरोधात १८० धावांनी मोठा विजय मिळवला होता. विशेष म्हणजे विश्वविक्रमादित्य विराट कोहली त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता. पाकिस्तानने ओव्हलच्या मैदानावर झालेल्या फायनलच्या सामन्यात ४ बाद ३३८ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताचा संघ अवघ्या १५८ धावांवर गारद झाला होता.

निवृत्ती जाहीर केल्यानंतर काय म्हणाला सरफराज?

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सरफराजनं प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. २००६ मध्ये अंडर १९ क्रिकेट संघाला वर्ल्डकप जिंकून देणे, तसेच २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खास होता. संघ सहकारी, प्रशिक्षक, कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानतो. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची कॅप्टन्सी करणं हे स्वप्न खरे होण्यासारखे होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो, अशा भावना सरफराजनं व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेडमध्ये रक्ताचा सडा! गँगवारच्या २४ तासांतच पुन्हा एक हत्या, शहरात दहशतीचे वातावरण

Nose Bleeding: उन्हाळा सुरू होताच नाकातून रक्त येतंय का? हे संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांकडे जा

Maharashtra Live News Update : नांदेड शहरात 24 तासात चौथा खून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

सतत थकवा, केस गळती आणि सांधे दुखी जाणवतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, वेळीच बदला या 5 सवयी

Shocking : महाराष्ट्र हादरला! नाशिकनंतर आणखी एका भोंदू बाबाचे भयंकर कृत्य; महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढले अन्...

SCROLL FOR NEXT