India T20 World Cup win saam tv
Sports

T20 World Cup: मानसिकदृष्ट्या खचलो होतो, तेव्हा सचिनने...; मास्टर ब्लास्टरचा गुरुमंत्र ठरला गेमचेंजर! संजूने सांगितली वर्ल्डकप विजयाची कहाणी

India T20 World Cup win: टीम इंडियाने टी२० वर्ल्डकप २०२६ जिंकत सलग दुसऱ्यांदा इतिहास रचला. संजू सॅमसनने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करत प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार मिळवला आणि विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

Surabhi Jayashree Jagdish

काल रात्री कोट्यवधी भारतीय चाहत्यांचं स्वप्न पूर्ण झालं. टीम इंडियाने आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्डकप २०२६ वर स्वतःचं नाव कोरलं आहे. सलग दुसऱ्यांदा भारताने वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आहे. यावेळी टीम इंडियाचा खरा हिरो संजू सॅमसन ठरला. संजूला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट देण्यात आला. यावेळी स्वप्न सत्यात उतरल्यानंतर संजू भावूक झाला होता.

टी-२० वर्ल्डकपच्या पूर्ण टूर्नामेंटमध्ये संजू सॅमसनने ३२१ रन्सची केले. फायनल जिंकल्यानंतर संजूने सांगितलं की, हा क्षण जणू एक स्वप्न खरं झाल्याप्रमाने आहे. या विजयानंतर तो त्याच्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नसल्याचंही संजूने म्हटलंय

विजयानंतर काय म्हणाला संजू?

संजू म्हणाला की, हे मला स्वप्नासारखं वाटतंय. मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. सध्या माझ्याकडे शब्द नाहीत आणि माझ्या भावनांना आवर घालणं कठीण आहे." सॅमसनने स्पष्ट केलं की, हा प्रवास एक-दोन वर्षांपूर्वी सुरू झाला होता. तो २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी टीमचा भाग होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

दोन वर्षांपासून तयारी होती सुरु

संजूने पुढे सांगितलं की, खरं सांगू तर याची सुरुवात एक-दोन वर्षांपासून झाली होती. २०२४ च्या वर्ल्डकप टीममध्येही मी होतो. मात्र मला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळी मी फक्त कल्पना करत होतो आणि मेहनत करत होतो. मला संधी मिळाल्यावर मी काय करावं याचा विचारही सुरु होता.

न्यूझीलंड सिरीजनंतरचा कठीण काळ

सॅमसनच्या सांगण्यानुसार, एक वेळ अशी होती जेव्हा तो पूर्णपणे निराश झाला होता. इतकंचन नाही तर न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजनंतर तो मानसिकदृष्ट्या ही खचला होता. संजू म्हणतो की, "न्यूझीलंड सिरीजनंतर मी पूर्णपणे खचलो होतो. माझ्या स्वप्नांचा चुराडा होत होता आणि मी विचार करत होतो की पुढे काय करावं. पण कदाचित देवाची योजना वेगळीच होती. शेवटी मोठं स्वप्नं पाहण्याचं धाडस केल्याचं मला फळ मिळालं."

सचिनचं मिळालं खास मार्गदर्शन

सॅमसन म्हणाला की, त्याच्या कठीण काळात अनेक माजी खेळाडूंनी त्याला मदत केली. त्यावेळी तो सचिन तेंडुलकरसोबतही संपर्कात होता. तो म्हणाला, "अनेक माजी खेळाडूंनी माझ्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांपासून मी सचिन सरांसोबत सतत संपर्कात आहे. मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोललो आणि चर्चा केली आहे. त्यांच्यासारख्या महान खेळाडूकडून मार्गदर्शन मिळणं ही एक मोठी गोष्ट आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT