Sanju Samson  saam tv news
Sports

Sanju Samson : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ;संजू सॅमसनच्या बोटाला फ्रॅक्चर, संघात पुनरागमन अशक्य?

sanju samson news : भारतीय संघाचा विकेटकीपर-बल्लेबाज संजू सॅमसनचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे.त्यामुळे तो एक महिन्यापेक्षा जास्त काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या संजू सॅमसन तिरुवनंतपुरममध्ये परतला असून, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA)मध्ये रिहॅबिलिटेशन पूर्ण केल्यानंतरच तो प्रशिक्षण सुरू करेल. सामना खेळण्यापूर्वी त्याला राष्ट्रीय अकादमीकडून तंदरूस्त असल्याची परवानगी घ्यावी लागेल. भारताचा स्टार क्रिकेटपटू व फलंदाज संजू सॅमसनच्या अंगठ्याला मोठी दुखापत होऊन अंगठयाचे हाड मोडले आहे. यामुळे किमान दोन ते तीन महिने संजूला फलंदाजी तसेच विकेटकीपिंग करण्यास मोठा अडथळा येणार आहे.

संजूला रणजी ट्रॉफी क्वार्टर फाइनलपासून देखील मुकावे लागणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या चेंडूवर सॅमसनच्या अंगठ्यावर जोरदार मार बसला. हा चेंडू 150 किमी प्रतितास वेगाने टाकला गेला होता. दुखापतीनंतरही सॅमसनने एक षटकार आणि चौकार लगावले, पण डगआउटमध्ये परतल्यावर त्याच्या अंगठ्याची सूज वाढली व स्कॅन केल्यानंतर अंगठा फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले.

इंग्लंडविरुद्धच्या पाच T20 सामन्यांत फक्त 51 धावा काढणाऱ्या सॅमसनला शॉर्ट बॉल्सचा सामना करताना अडचण आली. आर्चर,मार्क वुड आणि साकिब महमूद यांच्या शॉर्ट चेंडूंनी त्याला सातत्याने त्रास दिला आणि तो पावरप्लेमध्ये लवकर बाद होत राहिला. त्याची वनडे संघात निवड झाली नव्हती, तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही त्याला वगळण्यात आले. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 7 सामन्यांमध्ये 3 शतके झळकावणाऱ्या सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळला नव्हता,त्यामुळे संजूला थांबवण्यात आले होते.यासर्व घटनेमुळे त्याचे चाहते निराश झाल्याचे समाजमाध्यमांवर दिसले.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला जुलै अखेरपर्यंत कोणतीही सीमित ओव्हर सीरीज खेळायची नाही, त्यामुळे 30 वर्षीय सॅमसनला त्याच्या पुढील संधीसाठी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये होणाऱ्या सीरीजसाठी तयारी करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT