SANJU SAMSON twitter
Sports

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

Sanju Samson Six Hits Female Fan: संजू सॅमसनने मारलेला षटकार महिला फॅनला जाऊन लागला आहे.

Ankush Dhavre

जोहान्सबर्गमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना, संजू सॅमसनने वादळी खेळी केली. यादरम्यान संजूने सीमापार मारलेला चेंडू एका महिला फॅनला जाऊन लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्स गोलंदाजी करण्यासाठी आला. स्टब्स गोलंदाजीला येताच फलंदाजी करत असलेल्या संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर हल्लाबोल केला.

त्याने पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने खणखणीत षटकार खेचला. हा चेंडू स्टॅन्ड्समध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या महिला फॅनला जाऊन लागला. त्या महिला फॅनला वेदना असाह्य झाल्या होत्या. त्यामुळे ती रडताना दिसून आली.

संजू- अभिषेकची वादळी सुरुवात

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानावर आली होती. पहिल्या षटकापासूनच दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोघांनी मिळून ७३ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा १८ चेंडूत ३६ धावा करत माघारी परतला. मात्र त्यानंतर संजूने तिलक वर्मासोबत मिळून शतकी भागीदारी केली.

दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दक्षिण आफ्रिका (Playing XI): रायन रिकल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जान्सन, जेराल्ड कोएट्झी, अँडिले सिमलाने, केशव महाराज, लुथो सिपामला

भारत (Playing XI): संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रामनदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT