Sanju samson twitter
Sports

Sanju Samson Six: संजू सॅमसनने खेचला 110 मीटर लांब षटकार! चेंडू थेट स्टेडियमबाहेर- VIDEO

IND vs ZIM, 5th T20I: भारताचा आक्रमक फलंदाज संजू सॅमसनने ११० मीटर लांब षटकार खेचला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या मालिकेसाठी युवा खेळाडूंचा संघ पाठविण्यात आला होता.

या संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुभमन गिलच्या हाती सोपवण्याता आली होती. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला आहे. दरम्यान मालिकेतील शेवटच्या सामन्यात संजू सॅमसनने गगनचुंबी षटकार खेचला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात शुभमन गिल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसनने रियान परागसोबत मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याला सुरुवातीच्या १० चेंडूत अवघ्या १४ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजाच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार मारला. त्यानंतर सामन्यातील १२ व्या षटकात ब्रेंडन मावुताच्या षटकात सॅमसनने २ गगनचुंबी षटकार खेचले. या २ पैकी १ षटकार तर थेट मैदानाबाहेरच गेला.

संजू सॅमसनचा ११० मीटर लांब षटकार

सॅमसनने ब्रेंडन मावुताच्या षटकात जागेवरुनच ११० मीटर लांब षटकार खेचला. या चेंडूला लांबी आणि उंचीही मिळाली. त्यामुळे चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला. सॅमसनने या सामन्यात निर्णायक खेळी केली. त्याने ४५ चेंडूंचा सामना करत १२८.८९ च्या स्ट्राईक रेटने ५८ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचले. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने २६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर ६ गडी बाद १६७ धावा केल्या. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव अवघ्या १२५ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT