कोपा अमेरिका २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये अर्जेंटीना आणि कोलंबिया हे दोन्ही संघ आमनेसामे आले होते . या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात अर्जेंटीनाचा स्टार लियोनेल मेस्सीला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी विजयासाठी पूर्ण जोर लावला. शेवटी ९० मिनिटांचा खेळ पूर्ण होऊनही कुठल्याच संघाला विजय मिळवता आला नव्हता. शेवटी एक्स्ट्रा टाईममध्ये लुतारो मार्टीनेजने गोल केला आणि अर्जेंटीनाला १-० ने विजय मिळवून दिला.
अर्जेंटीनाने आतापर्यंत १६ वेळेस या स्पर्धेच्य जेतेपदावर नाव कोरलं आहे. लुतारोने एक्स्ट्रा टाईमनंतर संघाला मिळवून दिला. सामन्यातील १११ व्या मिनिटाला सोल्सोकडून पास मिळाल्यानंतर लुतारोला गोल करण्याची संधी होती. या संधीचा दोन्ही हातांन स्वीकार करत गोल केला. अर्जेंटीनाला या एकमेव गोलने विजय मिळवून दिला आहे.
हा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. मात्र सामना सुरु होण्यापूर्वीच स्टेडियमच्या बाहेर गोंधळ उडाला. ज्यांच्याकडे तिकीट नव्हतं असे फॅन्सही मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. त्यामुळे एन्ट्री गेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेट बंद केल्यामुळे ज्यांच्याकडे तिकीट होते, अशा फॅन्सलाही मैदानात येता आलं नाही. या कारणामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर ८२ मिनिट उशिराने हा सामना सुरु झाला.
अर्जेंटीनाने हा सामना जिंकून १६ वेळेस कोपा अमेरिकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. १९१६ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा खेळवली गेली होती. या स्पर्धेचे आयोजन अर्जेंटीनामध्ये केले गेले होते. या स्पर्धेत यजमान अर्जेंटीना आणि उरुग्वे या दोन्ही संघांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात उरुग्वेने अर्जेंटीनाला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर १९२१ मध्ये अर्जेंटीनाने पहिल्यांदाच या स्पर्धेतील जेतेपदावर नाव कोरलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.