sanju samson statement saam tv
क्रीडा

SRH vs RR, Qualifier 2: राजस्थानच्या पराभवानंतर संजू सॅमसन भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या स्पर्धेतील फायनलचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जाणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा प्रवास इथेच थांबला आहे. या सामन्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने पराभवाचं कारण सांगितलं आहे. (Sanju samson statement)

राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर बोलताना संजू सॅमसन म्हणाला की, 'हा खूप मोठा सामना होता . ज्याप्रकारे आम्ही गोलंदाजी केली ते पाहून नक्कीच आनंद झाला. आमच्याकडे मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजी खेळून काढणारा फलंदाज नव्हता. इथेच आम्ही सामना गमावला. आम्ही सामन्यावेळी दव येण्याची वाट पाहत होतो. मात्र आमचा अंदाज चुकला. दुसऱ्या डावात खेळपट्टी पूर्णपणे बदलली होती. त्यांनी मधल्या षटकांमध्ये उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, तिथे आम्ही बॅकफूटवर गेलो.' (SRH vs RR Qualifier 2)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थान रॉयल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकत, हैदराबादला प्रथम फलंदाजी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने १५ चेंडूंचा सामना करत ३७ धावा चोपल्या. सलामीला आलेल्या ट्रेविस हेडने २८ चेंडूंचा सामना करत ३४ धावा केल्या. या खेळीच्या बळावर हैदराबादने २० षटकखेअखेर ९ गडी बाद १७५ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी १७६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ध्रुव जुरेलने एकाकी झुंज देत ३५ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या. मात्र त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने ४२ धावा केल्या. तर कर्णधार संजू सॅमसन अवघ्या १० धावा करत माघारी परतला. राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना ३६ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

Wardha News: 'सत्ता आल्यावर लाडकी बहीणचे पैसे बंद', काँग्रेस नेत्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल; भाजप कार्यकर्त्याविरोधात तक्रार

knee Pain: गुडघे खूप दुखतात? रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Gunaratna Sadavarte: लॉरेन्स बिश्नोई प्रकरणात सदावर्तेंची उडी; म्हणाले, "सलमानला मदत करण पण..."

SCROLL FOR NEXT