Sanju samson fined by bcci for breaching code of conduct during dc vs rr match amd2000 twitter
क्रीडा

Sanju Samson Fined: पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला दुहेरी धक्का! BCCI कडून संजू सॅमसनवर मोठी कारवाई

Sanju Samson Fined By BCCI: दिल्लीच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली. दरम्यान बाद झाल्यानंतर त्याने अंपायरशी वाद घातला.

Ankush Dhavre

दिल्लीच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या २२२ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने एकाकी झुंज देत ८४ धावांची शानदार खेळी केली. दरम्यान बाद झाल्यानंतर त्याने एक मोठी चूक केली. आता बीसीसीआयने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे.

संजू सॅमसनवर ठोठावला दंड...

आयपीएलने आपल्या प्रेस रिलीझमध्ये लिहीले की, ' संजू सॅमसनने आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टच्या आर्टीकल २.८ च्या लेव्हल १ चे उल्लंघन केलं आहे. संजूनेही आपल्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य केले आहेत.'

या नियमानुसार, अंपायरने दिलेल्या निर्णयाचा विरोध केल्यास, बाद घोषित केल्यानंतर मैदान सोडण्यास उशीर करणं किंवा अंपायरशी वाद घातल्यास खेळाडूंवर कारवाई केली जाते. संजू सॅमसन देखील दोषी आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्यावर मॅच फी च्या ३० टक्के दंड आकारण्यात आला आहे.RCB

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. त्यावेळी १६ वे षटक टाकण्यासाठी मुकेश कुमार गोलंदाजीला आला. या षटकात त्याने स्लो चेंडू टाकला. या चेंडूवर संजू सॅमसनने लाँग ऑनच्या वरुन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या शाय होपने शानदार झेल टिपला.

दरम्यान संजू सॅमसनला वाटत होतं की, झेल घेत असताना शाय होपचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला आहे. मात्र रिव्ह्यूमध्ये असं काहीच दिसून आलं नाही. तिसऱ्या अंपायरनेही त्याला बाद घोषित केलं. दरम्यान हा निर्णय समोर आल्यानंतर तो अंपायरशी वाद घालताना दिसून आला. त्यामुळेच बीसीसीआयकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT