पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल २०२५ मधील रोमांचक सामना सध्या सुरू आहे. पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पंजाब किंग्सचे कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करत असताना संजू सॅमसनने विकेट पडल्यानंतर त्याची बॅट फेकली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दहाव्या ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसन बॉलिंग करण्यासाठी आला. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर संजू सॅमसनने बॅट फिरवून शॉट मारला. बॉल श्रेयस अय्यरच्या दिशेने गेला आणि अय्यरने सहज कॅच पकडली. पंजाब कर्णधाराने राजस्थान कर्णधाराला बाद केले. संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये होता. चुकीच्या शॉटमुळे कॅचआउट झाल्यानंतर त्याने रागाच्या भरात बॅट हवेत भिरकावली. त्याची बॅट हवेत गोल-गोल फिरुन खाली पडली. खाली पडलेली बॅट घेऊन संजू मैदानाबाहेर पडला.
राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीसाठी मैदानात उतरली. दोघांनीही दमदार सुरुवात करत पंजाबच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. संजू सॅमसनने ३८ धावा करत महत्वपूर्ण योगदान दिलं, तर यशस्वी जयस्वालने संयमी आणि प्रभावी खेळ करत ६७ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला. संजू आणि यशस्वी दोघांचीही विकेट लॉकी फर्ग्युसनने घेतली.
पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -
प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल
राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ -
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युधवीर सिंग चरक, संदीप शर्मा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.