राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौथ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स च्या टीमने दिल्लीला २१० धावांचं मोठे आव्हान दिलं होतं. दरम्यान या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. दिल्लीने सुरुवातीलाच त्यांचे टॉप ऑर्डर फलंदाज गमावले. मात्र आशुतोष शर्माने उत्तम कामगिरी केली आणि ३१ चेंडूत ६६ रन्सची खेळी करत टीमला विजय मिळवून दिला.
दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटच्या ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली आणि जिंकण्यासाठी दिलेलं लक्ष्य गाठलं. लखनऊसाठी, निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांची अर्धशतक व्यर्थ गेली. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतला पहिल्याच सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. दरम्यान लखनऊची टीम पराभवाच्या छायेत असताना मैदानाबाहेर एक अशी घटना घडली ज्यामुळे चाहत्यांना जुनी गोष्ट आठवली.
सामना संपल्यानंतर लगेचच लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका ऋषभ पंतशी बोलण्यासाठी मैदानावर आलेले दिसले. या काळात गोएंका पंतशी खूप बोलताना दिसले. यावेळी गोयंका पंतला काहीतरी समजावून सांगताना दिसले. तर टीमचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर देखील उपस्थित होते.
काही वेळातच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहताच त्यांना जुन्या अशाच घडलेल्या घटनेची आठवण झाली. यावेळी सर्वांनी या घटनेची तुलना केएल राहुलशी केली. २०२४ मध्ये लखनऊच्या पराभवानंतर गोयंका राहुलवर फार संतापलेले दिसले होते.
या सामन्यात लखनऊने स्फोटक फलंदाजी केली आणि २० षटकांत ८ विकेस्ट गमावून २०९ रन्स केले. यावेळी मिचेल मार्शने ३६ चेंडूत ७२ रन्स केले, तर निकोलस पूरनने ३० बॉल्समध्ये ७५ रन्सची खेळी केली. शेवटी डेव्हिड मिलरने १९ बॉल्समध्ये २७ रन्स केले. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने ३, विप्राज निगमने १, मुकेश कुमारने १ आणि कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या.
दरम्यान लखनऊने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीच्या टीमने ओव्हर्समध्ये २ विकेट्स गमावल्या. तर त्यानंतर ६५ रन्समध्ये ५ विकेट गमावल्या. मात्र यावेळी आशुतोष शर्मा खंबीरपणे उभा राहिला. ज्यावेळी टीमला ५ रन्सची आवश्यकता होती तेव्हा आशुतोषने सिक्स मारून टीमला विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.