Sania Mirza Instagram @mirzasaniar
Sports

Sania Mirza and Shoaib Malik Divorce: शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटावर सानिया मिर्झाने सोडलं मौन, म्हणाली...

Sania Mirza and Shoaib Malik News: शोएब आणि सना यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर शोएब आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाल्याचा वृत्ताला दुजोरा मिळाला. त्यानंतर आता खुद्द सानिया मिर्झाने शोएबसोबतच्या घटस्फोटावर मौन सोडलं आहे

Vishal Gangurde

Sania Mirza Divorce:

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक पुन्हा नव्या लग्नबंधनात अडकला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. शोएब आणि सना यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर शोएब आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाल्याचा वृत्ताला दुजोरा मिळाला. त्यानंतर आता खुद्द सानिया मिर्झाने शोएबसोबतच्या घटस्फोटावर मौन सोडलं आहे. (Latest Marathi News)

मिर्झाने चाहत्यांना केलं मोठं आवाहन

मीडिया रिपोर्टनुसार, सानिया मिर्झाच्या टीमने घटस्फोटाच्या एक जाहीर करत वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सानियाच्या टीमने जाहीर केलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे की, 'सानिया मिर्झाने तिचं वैयक्तिक आयुष्य लोकांपासून लांब ठेवलं आहे. आज मात्र तिला सांगावं लागत आहे की, शोएब आणि तिचा घटस्फोट काही महिन्यापूर्वी झाला. ती शोएबला नव्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे.हा तिच्या जीवनातील संवेदनशील काळ आहे. आम्ही सर्व हितचिंतक आणि चाहत्यांना विनंती करतो की, सानियाच्या खासगी आयुष्याचा आदर करा'.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलगा इजहान आई सानियासोबत राहतोय

शोएब मलिक आणि सानियाचं लग्न १२ एप्रिल २०१० साली झालं. या दोघांचं लग्न हैदराबादमध्ये झालं. लग्नाच्या आठ वर्षानंतर सानियाने मुलाला जन्म दिला. २०१८ साली मुलगा इजहानचा जन्म झाला. इजहान आता पाच वर्षांचा झाला आहे. सध्या तो आई सानियासोबत राहत आहे.

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. सानियाच्या वडिलांनी पीटीआय वृत्त संस्थेला सांगितलं की, 'सानियाचा खुला झाला आहे. 'खुला' आणि 'तलाक'मध्ये अधिक अंतर नसतं. पत्नी वेगळा होण्याचा निर्णय घेते, त्याला खुला म्हटलं जातं. तर पती वेगळा होण्याचा निर्णय घेतो, त्याला तलाक म्हटलं जातं.

शोएब मलिक पाकिस्तानी क्रिकेटर आहे. सानियाने गेल्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेतली होती. ३७ वर्षांच्या सानिया ग्रँड दुहेरी सहा वेळा जिंकली आहे. त्यात तीन मिश्र दुहेरी आणि तीन महिाला दुहेरीचे किताब जिंकले आहेत. ती अखेरच्या ग्रँड स्लॅम २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया खुल्या स्पर्धेत महिला दुहेरी जिंकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT