Sandeep Sharma DC VS RR IPL 2025. X
Sports

Wd,0,Wd,Wd,Wd,2Nb…; सामन्यात बॉलिंग करायला संदीप शर्मा विसरला, नकोसा विक्रम नावावर जोडला अन् द्रविडही भडकला

DC VS RR IPL 2025 : अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात गोलंदाजी करताना राजस्थानच्या संदीप शर्माने नकोशा विक्रमाची नोंद केली. त्याने एका ओव्हरमध्ये तब्बल ११ चेंडू फेकले.

Yash Shirke

Sandeep Sharma : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात संजू सॅमसनने टॉस जिंकली आणि राजस्थानने प्रथम गोलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हर्समध्ये १८८ धावा केल्या. आता राजस्थान रॉयल्ससमोर १८९ धावा करण्याचे आव्हान आहे.

गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरने २ विकेट्स घेतल्या. वनिंदू हरसंगा आणि महीशा थीक्षणा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. पण आजच्या सामन्यात एकही विकेट घेणाऱ्या संदीप शर्माची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. संदीप शर्माची चर्चा होतेय, याला कारण आहे, त्याची आजच्या सामन्यातील शेवटची ओव्हर! दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी तब्बल ११ चेंडू फेकले. वाईड, शून्य, वाईड, वाईड, वाईड, २ नॉ बॉल, ४, ६, १, १, २ अशा प्रकारे संदीप शर्माने शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचे नाव जोडले गेले आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब ओव्हर टाकणारे गोलंदाज -

तुषार देशपांडे - ११ चेंडू - विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, २०२३

मोहम्मद सिराज - ११ चेंडू - विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२३

शार्दूल ठाकूर - ११ चेंडू - विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, २०२५

संदीप शर्मा - ११ चेंडू - विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०२५

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ -

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वनिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीशा थीक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, लोकेश राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT