sandeep lamichhane google
Sports

Sandeep Lamichhane: नेपाळच्या माजी कर्णधाराला अमेरिकेकडून रेड सिग्नल! टी -२० वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं

Sandeep Lamichhane, T-20 World Cup 2024: संदीप लामिछाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी अमेरिकेला जाऊ शकणार नाहीये.

Ankush Dhavre

नेपाळ संघाने पहिल्यांदाच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश केला आहे. मात्र माजी कर्णधार संदीप लामिछाने ही स्पर्धा खेळण्यासाठी अमेरिकेला जाऊ शकणार नाहीये. कारण अमेरिकेने त्याला दुसऱ्यांदा व्हिजा देण्यास नकार दिला आहे. ज्यावेळी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी नेपाळ संघाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी बलात्काराच्या आरोपात संदीप लामिछाने तुरुंगात होता. आता त्याला क्लीनचीट मिळाली आहे. मात्र तरीदेखील त्याला अमेरिकेने व्हिजा देण्यास नकार दिला आहे.

संदीप लामिछानेला क्लीन चीट मिळाल्यानंतर नेपाळचे क्रिकेट फॅन्स खुश झाले होते. कारण त्यांना वाटलं होतं की, तो आता टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी अमेरिकेला जाऊ शकतो. मात्र नेपाळमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासाने त्याचा व्हिजा अर्ज फेटाळून लावला आहे.

अमेरिकेच्या दूतावासांकडून संदीप लामिछानेचा व्हिजा अर्ज फेटाळून लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील २०१९ मध्ये त्याचा व्हिजा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यावेळी त्याने सोशल मीडियाद्वारे आपलं दुःख व्यक्त केलं होतं. आता पुन्हा एकदा हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने सोशल मीडियावर आपलं दुःख व्यक्त केलं आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले की, ' अमेरिकन दूतावासांनी तेच केलं जे यापूर्वी २०१९ मध्येही केलं होतं. त्यांनी अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीचा व्हिजा अर्ज फेटाळून लावला आहे.'

तरुणीवर बलात्कार करण्या प्रकरणी संदीप लामिछानेला ८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर पाटन उच्च न्यायालयाने काठमांडू जिल्हा न्यायालयाने निर्णय फेटाळून लावला आणि संदीप लामिछाला क्लीन चीट दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT