Sandeep Lamichhane: दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूचं करियर संपल!कोर्टाने सुनावली ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Sandeep Lamichhane News In Marathi: आयपीएल स्पर्धेत नेपाळकडून खेळणाऱ्या संदीप लामिछानेच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले गेले हो
Sandeep Lamichhane
Sandeep Lamichhanesaam tv news
Published On

Sandeep Lamichhane Sentenced In Prison For 8 Years:

आयपीएल स्पर्धेत नेपाळकडून खेळणाऱ्या संदीप लामिछानेच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले गेले होते. हे आरोप आता सिद्ध झाले आहेत. न्यायालयाने अखेरच्या सुनावणीत दिलेल्या निर्णयाने संदीप लामिछानेला मोठा धक्का बसला आहे. त्याला ८ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संदीप लामिछानेला पाहुन नेपाळमध्ये क्रिकेटचा क्रेझ वाढला. त्याला पाहुन अनेकांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वर्षी त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्याचे आरोप केले गेले होते.

हे आरोप आता सिद्ध झाले आहेत. मात्र ज्यावेळी लैंगिक शोषण करण्यात आले त्यावेळी पीडित तरुणी अल्पवयीन नव्हती असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

अखेर बुधवारी (१० जानेवारी) न्यायालयाने संदीप लामिछानेच्या प्रकरणावर शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश शिशिर राज यांनी त्याला ८ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यापूर्वी पीडित तरुणीने काठमांडू पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. (Cricket news in marathi)

Sandeep Lamichhane
IND vs AFG 1st T20I: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर; नेमकं कारण काय?

ज्यावेळी ही तक्रार नोंदवली गेली त्यावेळी संदीप लामिछाने वेस्टइंडिजमध्ये होता. त्यावेळी तो कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ही स्पर्धा अर्ध्यातुन सोडून माघारी परतावं लागलं होतं.

ज्यावेळी त्याला हा वॉरंट मिळाला त्यावेळी तो कोणाच्याच संपर्रकात नव्हता. त्यानंतर नेपाळ पोलिसांनी त्याचा तपास घ्यायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी इंटरपोलची मदत घेतली. संदीपविरोधात इंटरपोलने डिफ्युजनची नोटीसही काढली होती. काही दिवस उलटल्यानंतर संदीप लामिछाने काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पॉट झाला. इथेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Sandeep Lamichhane
IND vs AFG T20 Match: केव्हा,कधी अन् कुठे रंगणार भारत-अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com