Sam Curran Saam TV
क्रीडा

Sam Curran Most Expensive Player: सॅम करन ठरला IPLमधील सर्वात महाग खेळाडू; पंजाबकडून अक्षरश: पैशांचा पाऊस

पंजाब किंग्जने तब्बल 18.50 कोटी रुपयांना त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL Auction 2023 : आयपीएल 2023 च्या लिलावाला सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे अनेक खेळांडूवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडला आहे. तसेच या लिलावात आतापर्यंतची सर्वात मोठी बोली इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याच्यावर लागली आहे. पंजाब किंग्जने तब्बल 18.50 कोटी रुपयांना त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.

सॅम करनला दुखापतीमुळे आयपीएलच्या मागीलच्या मोसमाला मुकावे लागले होते. यंदाच्या सीजनमध्ये तो नव्या जोमाने पंजाब किंग्सची जर्सी घालून उतरणार आहे. करनला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये दीर्घ लढाई झाली, ज्यामध्ये पंजाबने बाजी मारली. यासह करन आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. (Sports News)

सॅम करन आयपीएल कारकीर्द

आयपीएलमध्ये 32 सामने खेळणाऱ्या सॅम करनने 23 डावांमध्ये 22.47 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये करनच्या नावावर दोन अर्धशतके आहेत, तर गोलंदाजीत त्याने 31 डावात 31.09 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत.  (IPL 2023)

पंजाब किंग्जकडून खेळताना करनने हॅट्ट्रिक देखील घेतली घेतली. 20 वर्षे आणि 302 दिवसांच्या वयात हॅट्ट्रिक घेणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.

इंग्लिश खेळाडूंवर पैशांचा पाऊस

आतापर्यंत झालेल्या लिलावात इंग्लिश खेळाडूंवर संघाची नजर असल्याचं दिसून आलं आहे. सॅम करनसह हॅरी ब्रुक याला देखील हैदराबादने 13.25 कोटींमध्ये करारबद्ध केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT