पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने भारताविरुद्ध ५८ धावा केल्या. पण नंतर त्याच्या कामगिरीने वाद निर्माण झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनमुळे वाद निर्माण झालाय. अर्धशतक झळकावल्यानंतर साहिबजादाने गन सेलिब्रेशन केलं. त्याने बॅट उलटी करत बंदूक चालवल्यासारखी कृती केली.
साहिबजादा फरहानने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याला पुढील ११ चेंडूत एकही चौकार मारता आला नाही. एवढेच नाही तर शिवम दुबेने त्याच्या उत्कृष्ट स्लोअर बॉलने साहिबजादालाही बादही केलं. दुबेच्या चेंडूवर साहिबजादाने एक लांब षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हातातून बॅट निसटली आणि कव्हरवर उभ्या असलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचा झेल घेतला.
दोन जीवनदान मिळाल्यानंतर साहिबजादाने भारताविरुद्ध अर्धशतक झळकावलं. अभिषेक शर्माने साहिबजादाचे दोन्ही झेल सोडले. साहिबजादा शुन्य धावांवर असताना त्याला पहिले जीवनदान मिळाले होते. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. त्यानंतर अभिषेक शर्माने पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेल सोडला.
ज्या खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाज अपयशी ठरले, त्या खेळपट्टीवर दुबेने आपल्या गोलंदाजीने मने जिंकली. त्याने ४ षटकांत ३३ धावा देत २ बळी घेतले. साहिबजादा व्यतिरिक्त, त्याने सॅम अय्युबचीही विकेट घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.