sunil gavaskar twitter
Sports

Sachin Tendulkar Dance: 'ओम शांती ओम'वर क्रिकेटच्या देवाचे थिरकले पाय; गावसकरांनीही केला भन्नाट डान्स - VIDEO

Sachin Tendulkar Dance On Om Shanti Om: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ओम शांती ओमवर भन्नाट डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेटच्या अनेक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सचिन तेंडुलकर अन् सुनील गावसकरांचा भन्नाट डान्स

ज्या खेळाडूंनी मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे, अशा सर्व खेळाडूंना या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. ज्यात दिलीप वेंगसरकरपासून ते रोहित शर्मापर्यंत सर्व दिग्गज खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं होतं.

रोहित शर्मा, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर झ रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणेसारख्या स्टार खेळाडूंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला दिग्गज गायकांनी देखील शानदार परफॉर्मन्स सादर केले.

या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शेखर रवजियानी यांना देखील आमंत्रित केलं गेलं होतं. सर्व दिग्गज मंडळी स्टेजवर असताना शेखरने ओम शांती ओम गाणं गायलं. स्टेडियममध्ये असलेला माहोल आणि गाणं ऐकून मास्टर ब्लास्टरलाही डान्स केल्याशिवाय राहवलं नाही.

सचिन तेंडुलकरला डान्स करताना पाहून सुनील गावसकरही स्वत:ला थांबवू शकले नाही. ते देखील डान्स करताना दिसून आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

वानखेडे स्टेडियम बांधून ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या स्टेडियमच्या बांधकामाला १९७४ मध्ये सुरुवात झाली होती. तर अवघ्या १३ महिन्यात हे स्टेडियम बांधून खेळण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. या स्टेडियमचं काम वानखेडे यांच्या देखरेखेखाली करण्यात आलं होतं. म्हणून या स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलं होतं. या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना १९७५ मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

Thackeray Brothers : राज-उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, विजयी मेळाव्याआधी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

SCROLL FOR NEXT