sachin tendulkar saam tv news
Sports

Sachin Tendulkar Statue: क्रिकेटच्या देवाचा सन्मान! ज्या मैदानावर घडला, त्याच मैदानावर उभारला सचिनचा पुतळा

Sachin Tendulkar Statue News: मुंबईच्या वानखेडे मैदानावर सचिनचा पुतळा उभारण्यात आला आहे.

Ankush Dhavre

Sachin Tendulkar Statue At Wankhede Stadium:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसापूर्वी वानखेडे स्टेडियमवर विशेष कार्यक्रम पार पडला आहे.

वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआयचे सजिव जय शाह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार देखील उपस्थित होते. (Latest sports updates)

या पुतळ्याचं अनावरण स्वत: सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी सचिन तेंडुलकरच्या कुटुंबासह इतर बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. हा पुतळा सचिन तेंडुलकर स्टँडजवळ उभारण्यात आला आहे. याच मैदानावर खेळून सचिन तेंडुलकर मोठा क्रिकेटपटू झालाय. याच मैदानावर त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

T20 World Cup 2026: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर होणार? रन रेटनं वाढवलं टेन्शन

Thyroid Disease Symptoms: अचानक जास्त थंडी वाजतेय? सावध व्हा, थायरॉईडच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Ladki Bahin Yojana: जानेवारीचा हप्ता खात्यात जमा, पण या लाडकींना ₹१५०० मिळणार नाहीत

Good News: विदर्भासाठी आनंदाची बातमी! पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, फडणवीस सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT