Sachin Tendulkar In Wankhede Stadium ANI
Sports

Sachin Tendulkar : "मी दहा-साडेदहा वर्षांचा.." सचिन तेंडुलकरने मराठीत सांगितला वानखेडेतील पहिला अनुभव

Sachin Tendulkar In Wankhede Stadium : आज वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर उपस्थित होता.

Yash Shirke

Sachin Tendulkar : मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमला आज (१९ जानेवारी) ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने वानखेडे मैदानात सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यासह असंख्य क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर सचिनला मंचावर बोलवण्यात आले. या प्रसंगी त्याने जमलेल्या सर्वांसमोर मराठीमध्ये संवाद साधला.

सचिन तेंडुलकर मंचावर पोहचल्यावर 'सचिन..सचिन..' अशा घोषणा सुरु झाल्या. त्यानंतर सचिनला वानखेडे स्टेडियमशी असलेल्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे सचिनने मराठीमध्ये दिली. तो म्हणाला, "सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही विचार करत असाल की, माझ्या हातात पाण्याची बाटली का आहे, काही वर्षांपूर्वी मी इथे निवृत्तीचे भाषण करत होतो तेव्हाही माझ्या हातात पाण्याची बाटली होती. तशीच भावना आत्ताही आहे, वानखेडेमध्ये आल्यावर.. तितकंच प्रेम तुम्ही आता माझ्यावर करताय त्याबद्दल धन्यवाद."

तो पुढे म्हणाला, "वानखेडेला ५० वर्ष पूर्ण झाली. ५० वर्ष वानखेडेने आपल्याला इतका आनंद दिलेला आहे. पण ग्राउंड स्फाड, सर्व सहकारी, पदाधिकारी, खेळाडू आणि क्रिकेटचे चाहते तुम्ही सगळे एकत्र आलात, तेव्हाच सुवर्ण क्षण जन्माला आले. मी पहिल्यांदा वानखेडेवर आलो, तेव्हा मी दहा-साडेदहा वर्षांचा होतो. गमतीची गोष्ट अशी माझ्याकडे तिकीट नव्हतं. कमी उंचीमुळे मला आत घुसवलं होतं तो माझा पहिला अनुभव होता वानखेडेमधला.. तेव्हा मला वाटलं की इथे वानखेडेत येऊन खेळायला हवं. तिथं माझा वानखेडेबरोबरचा प्रवास सुरु झाला."

"फक्त आंतरराष्ट्रीय सामने नाही, तर रणजी स्पर्धेतही आम्ही इथे खूप मज्जा केली. माझ्या आयुष्यात वानखेडे स्टेडियमला अढळ स्थान आहे ते तसचं कायम राहणार आहे. आता आपण ही ५० वर्ष आनंद घेतला आहे. अजून ५०..१०० वर्ष, अनेक वर्ष क्रिकेटचा आनंद घेऊयात.. क्रिकेटला सपोर्ट करुयात अशी मी अशी मला आशा आहे", असे म्हणत सचिनने मनातील भावना शब्दांमध्ये सांगितल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT