क्रीडा

Sachin Tendulkar Tweet: सचिन कधी बोलत नाही, बोलला तर सोडत नाही; शोएब अख्तरला एकाच वाक्यात गार केलं

Vishal Gangurde

Sachin tendulkar Tweet:

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान या दोन्ही संघाचा रोमांचक सामना झाला. भारताच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवत पाकिस्तानला धूळ चारली आहे. काल माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सचिन तेंडुलकर आणि त्याचा फोटो शेअर करत पाकिस्तान संघाला सामना जिंकण्यासाठी सल्ला दिला होता. शोएबच्या ट्विटला रिट्विट करत सचिन तेंडुलकरने एकाच वाक्यात जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंनी भारतीय खेळाडूंना अनेक सल्ले दिले होते.

युवराज सिंगनेही शुबमन गिलला फोन करून लाखमोलाचा सल्ला दिला होता. तर दुसरीकडे शोएब अख्तरनेही त्यांच्या पाकिस्तानी खेळाडूंना ट्विट करत सल्ले दिले होते. काल शोएब अख्तरने पाकिस्तानी खेळाडूंना 'जिंकायचं असेल तर डोकं शांत ठेवले पहिजे, असा सल्ला दिला होता.

सचिनचं चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरचा बाद झाल्यानंतरचा जुना फोटो शेअर केला होता. तसेच पाकिस्तानी खेळाडूंना सल्ला दिला होता. मात्र, आता टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरने शोएबला चोख प्रत्युतर दिलं आहे. 'माझ्या मित्रा तुझा सल्ला पाकिस्तान टीमने ऐकला आणि सर्व शांतच राहिले , अशा शब्दात सचिनने शोएब अख्तरला प्रत्युत्तर दिलंय.

सचिन तेंडुलकरने ट्विट करत प्रत्युत्तर दिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. 'आता काय म्हणावं...अजून पाकिस्तानच्या नागरिकांनी टीव्ही फोडले नाहीत, तुम्ही इथे यांना फोडत आहात, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT