Shoaib Akhtar Tweet: शोएब अख्तर तोंडावर आपटला! आपल्याच खेळाडूंवर संताप व्यक्त करत म्हणाला.. .

India vs Pakistan, Shoaib Akhtar Tweet: शोएब अख्तरने केलेलं ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
pakistan cricket team
pakistan cricket team saam tv news

Shoaib Akhtar Tweet:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला.

दरम्यान पाकिस्तानी फलंदाजांच्या या सुमार कामगिरीनंतर पाकिस्तानी दिग्गज आपल्याच खेळाडूवर भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.

हा सामना सुरू असतानाच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने एक ट्विट केलं होतं, जे तुफान व्हायरल होत आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, ' सव्वा लाख लोकांना गप करण्यासाठी तुमच्यात ती आग हवी असते. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमच्यात ती आग असेल..' या ट्विटवर नेटकरीही भन्नाट प्रतिक्रीया देताना दिसून येत आहे.

तसेच भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठानने देखील ट्विट करत पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये, शेजारी देशात शातंता पसरली आहे...' (Latest sports updates)

पाकिस्तानचा डाव १९१ धावांवर संपुष्टात..

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना, बाबर आझमने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.

pakistan cricket team
IND vs PAK, World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार? हवामान खात्याने दिली माहिती

तर मोहम्मद रिजवानने ४९ धावा चोपल्या. सलामीवीर फलंदाज इमाम उल हक ३६ तर अब्दुल्ला शफिकने २० धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com