12 वर्षे सामन्याआधी झोपलोच नाही; सचिनचा धक्कादायक खुलासा! Saam Tv
Sports

12 वर्षे सामन्याआधी झोपलोच नाही; सचिनचा धक्कादायक खुलासा!

भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वृत्तसंस्था

भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) शतकांचे शतक झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमध्ये सर्वाधिक धावा करणारा म्हणून आपली कारकीर्द संपवली आणि तो रेकॅार्ड आजही त्याच्या नावावर आहे. 25 वर्षे भारताकडून खेळणारा आणि त्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे, ज्यात त्याने सांगितले आहे की तो सामन्याच्या एक दिवस अगोदर रात्री नीट झोपत नव्हता.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सचिनने सांगितले की, संपूर्ण कारकिर्दीत तो सामन्याच्या एक दिवसापुर्वी तो झोपू शकत नव्हता. कारण तो सामन्याबद्दल विचार करत असायचा आणि ज्याच्या विचाराने तो घाबरत असे, परंतु तोे यातून कधीही बाहेर पडला नाही.

खेळाडूंना एका मोठ्या सामन्याआधी कोणत्या चिंता किंवा अस्वस्थतेला सामोरे जावे लागते? यावर उत्तर देताना सचिन म्हणाला, "जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी असेल तर नक्कीच थोडी अस्वस्थता असते. हे फक्त कारण आहे की मला माझ्या क्रिकेटची काळजी होती आणि प्रत्येक वेळी खेळायला जायचे तेव्हा मला चांगला खेळ करायचा होता. मी म्हणेन, माझ्या कारकिर्दीची पहिली 12 वर्षे मी सामन्याच्या एक दिवस अगोदर नीट झोपलो नाही''.

तो पुढे म्हणाला, “मी सतत गोलंदाजांना कसे सामोरे कसं जायचं याचा विचार करायचो. ते कसे गोलंदाजी करतील, माझा खेळण्याचा पर्याय काय आहे? मी याबद्दल विचार करत राहिलो आणि यामुळे झोपेबरोबर लढत राहिलो, परंतु काही काळानंतर मी एक विचार केला आणि नंतर, माझा असा विश्वास होऊ लागला की माझे शरीर आणि मन खेळासाठी तयार होत आहे''. त्याचवेळी, जेव्हा सचिनला विचारण्यात आले की त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला झोपेची ही समस्या होती का? या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, "होय, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत असे घडले आणि बाहेर पडल्यानंतर मी माझ्या भावाशी याबद्दल बोलायचो आणि माझ्या शेवटच्या कसोटीपर्यंत ते घडले. काही सवयी कायम तुमच्या सोबत राहतात".

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT