sachin tendulkar  Saam tv
Sports

Lifetime Achievement Award : क्रिकेटच्या देवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रातील मिळाला मोठा पुरस्कार

sachin tendulkar News : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सचिन तेंडुलकरला क्रीडा क्षेत्रातील मोठा पुरस्कार मिळाला आहे. सचिनला बीसीसीआयकडून पुरस्कार मिळाला आहे.

Vishal Gangurde

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सचिन तेंडुलकरला बीसीसीआयकडून जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. मुंबईतील बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार समारंभात सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार मिळाला आहे.

सचिन तेंडुलकरला याआधी कधीही पुरस्कार मिळाला नव्हता. बीसीसीआयच्या या समारंभात बीसीसीआय सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सचिनला याआधी भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, पद्मश्री, पद्म विभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील मिळाला आहे. तर २०१२ साली त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने देखील गौरवण्यात आलं होतं. आयसीसी आणि बीसीसीआयने सचिन तेंडुलकरला अनेक क्रीडा पुरस्कार दिले आहेत.

भारतासाठी ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या ५१ वर्षीय सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेट इतिहासातील कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. सचिनने २०० कसोटी सामने आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्याने वनडेमध्ये १८,४२६ धावा कुटल्या आहेत. तर कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा कुटल्या आहेत. सचिने त्याच्या इंटरनॅशन करिअर क्रिकेटमध्ये एकच टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. याआधी २०२३ साली भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनीअर यांना बीसीसीआयने पुरस्काराने सन्मानित केले होते.

सचिन फलंदाजी करण्यास उतरल्यानंतर क्रिकेटप्रेमी एकच जल्लोष करायचे. सचिनने पाकिस्तान विरोधातील कसोटी सामन्यात १६ वर्षे २०५ दिवसांचा असताना पदार्पण केले. त्यानंतर त्याने २४ वर्ष क्रीडाविश्वावर छाप उमटवली.

सचिनच्या नावावर टेस्ट आणि वनडे या दोन्ही फॉरमॅटमध्ये मिळून १०० शतक ठोकण्याचा विक्रम आहे. २०११ साली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातही सचिन तेंडुलकर होता. त्याचा सहावा आणि शेवटचा विश्वचषक होता. सचिनची फलंदाजी पाहण्यासाठी स्टेडियमवर एकच गर्दी व्हायची. सचिन फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT