Independence Day 2024: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली..दिग्गज क्रिकेटपटूंनी असा साजरा केला स्वातंत्र्यदिन
gautam gambhir rohit sharmatwitter

Independence Day 2024: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली..दिग्गज क्रिकेटपटूंनी असा साजरा केला स्वातंत्र्यदिन

Indian Cricketers Independence Day Celebration: आज देशभरात ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. दरम्यान भारतीय क्रिकेटपटूंनी कसा साजरा केला स्वातंत्र्यदिन? जाणून घ्या.
Published on

देशभरात आज ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. भारताचे चॅम्पियन खेळाडूही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देताना दिसून येत आहे. भारतीय संघातील स्टार खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा,सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Independence Day 2024: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली..दिग्गज क्रिकेटपटूंनी असा साजरा केला स्वातंत्र्यदिन
IND vs BAN: गंभीर-रोहितला डोकेदुखी! केएल राहुल, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंत यांच्यामुळे या तिघांचा पत्ता कट?

भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, 'तिरंग्याखाली उभं राहणं हे माझ्यासाठी नेहमीच अभिमानास्पद राहिलं आहे. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..'

अलीकडेच भारतीय संघाचं मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरनेही सोशल मीडियाद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गंभीरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो आपल्या पत्नी आणि मुलांसोबत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने,'स्वातंत्र्याची एक किंमत असते. आपले नायक रोज आपल्या रक्ताने ही किंमत चुकवतात! कधीही विसरू नका.' असं लिहिलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याच्या हातात तिंरगा असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ वर्ल्डकप विजयी परेडचा आहे. फॅन्स या व्हिडिओवर कमेंट्साचा वर्षाव करत आहेत. यासह भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी देखील पोस्ट शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com