south africa twitter
Sports

SA vs PAK: दक्षिण आफ्रिकेचा WTC च्या फायनलमध्ये प्रवेश! टीम इंडियासाठी कसं आहे समीकरण?

WTC Final 2025: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर होता.

मात्र शेवटी कगिसो रबाडा आणि मार्को यान्सेन यांनी ५१ धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देत फायनलचं तिकीट मिळवून दिलं. या सामन्यात पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद अब्बासने ६ गडी बाद केले, मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला २३७ धावांवर ऑलआऊट केलं. दरम्यान दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १४८ धावांचं आव्हान मिळालं होतं. आव्हान छोटं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला हवी तशी सुरुवात करता आली नाही. १९ धावांवर दक्षिण आफ्रिकेचे ३ फलंदाज माघारी परतले होते.

त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने संघाचा डाव सांभाळला. बावुमाने टिचून फलंदाजी करत संघाची धावसंख्या १०० जवळ पोहोचवली. इथून पुढे दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी अवघ्या ५२ धावा करायच्या होत्या. बावुमा बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळला. अवघ्या ११ धावांवर दक्षिण आफ्रिकेचे ३ फलंदाज तंबूत परतले. यादरम्यान पाकिस्तानकडून गोलंदाजी करणाऱ्या अब्बासने ६ गडी बाद केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ५ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु होती. ज्यात भारत,दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा समावेश होता. मात्र आता या ४ संघांना मागे सोडत दक्षिण आफ्रिकेने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये सुरु आहे. हा सामना आता दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ हा सामना जिंकेल, तो संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी एक पाऊल टाकणार आहे.

त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. भारतीय संघाला जर कुठल्याही संघाच्या निकालावर अवलंबून न राहता फायनलमध्ये जायचं असेल, तर पुढील उरलेले दोन्ही सामने कुठल्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT