jp duminy twitter
Sports

JP Duminy: फिल्डर्स थकले म्हणून प्रशिक्षक उतरला मैदानात; भन्नाट डाईव्ह मारत असा चेंडू अडवला की..-VIDEO

JP Duminy Fielding For South Africa: दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्यूमिनीने मैदानात उतरुन शानदार फिल्डींग केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

IRE vs SA, JP Duminy Fielding: आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा वनडे सामना सोमवारी (७ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात आयर्लंडने मोठा उलटफेर करत दक्षिण आफ्रिकेवर ६९ धावांनी शानदार विजय मिळवला.

यासह दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिका २-१ ने खिशात घातली. दरम्यान तिसऱ्या सामन्यात एक आगळीवेगळी घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्यूमिनी क्षेत्ररक्षण करताना दिसून आला. दरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याने एक अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा सामना अबूधाबीमध्ये पार पडला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना खूप जास्त उष्णतेमुळे थकवा आणि वेदना जाणवत होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्यूमिनीला क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात यावं लागलं.

जेपी ड्यूमिनी हा दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेसाठी प्रशिक्षकाची भूमिका बजावतोय. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन ५ वर्षे उलटूनही त्याचा जोश काही कमी झालेला नाही. त्याने चेंडू अडवण्यासाठी डाईव्ह मारली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जेपी ड्यूमिनीची स्फुर्ती पाहून नेटकरी कौतुक करताना दिसून येत आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. तर हेरी टेक्टरने ६० धावा केल्या. शेवटी बालबर्निने ४५ धावांची खेळी करत आयर्लंडने ९ गडी बाद २८४ धावांपर्यंत मजल मारली.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २८५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून जेसन स्मिथने ९१ धावांची खेळी केली. तर काईल वेरियेनने ३८ धावांची खेळी केली. मात्र दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या २१५ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेला हा सामना ६९ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

SCROLL FOR NEXT