विश्वचषकात आज दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशदरम्यान २३ वा सामना वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी बांगलादेशविरुद्ध तडाखेबाज खेळी करत धावांचा डोंगर रचला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ३८३ धावांचं आव्हान बांगलादेशला दिलं. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ २३३ धावांवर गारद झाला. (Latest Marathi News)
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला ३८३ धावांचं आव्हान दिलं. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानााचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशच्या संघाने सावधपणे सुरुवात केली.
मात्र, दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला ७ व्या षटकात दोन धक्के दिले. ७ व्या षटकातील पहिल्या चेंडूत तंजीद हसन आणि दुसऱ्या चेंडूत नजमुल हुसैन मंटो बाद झाला. दोघांनी यष्टीरक्षकाला झेल देऊन बाद झाले. तंजीद हा १२ धावांवर बाद झाला तर शंटो शून्यावर बाद झाला. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)
बांगलादेशला आठव्या षटकात तिसरा धक्का बसला. त्यानंतर मुशफिकुरच्या रुपाने चौथा धक्का बसला. पुढे १५ व्या षटकात लिटन दास पायचीत बाद झाला. लिटनच्या रुपाने बांगलादेशला पाचवा धक्का बसला. लिटन दास बाद झाल्यानंतरही बांगलादेशच्या फलंदाजांची पडझड सुरुच राहिली.
बांगलादेशचा संघ संकटात असताना महमुदुल्लाहने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. महमुदुल्लाहने ६७ चेंडूत ५० धावा कुटल्या. पुढे ३७ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेने हसन महमूदला बाद केले.
बांगलादेशच्या ४० षटकापर्यंत २०० पार धावा झाल्या होत्या. महमुदुल्लाहने सयंमी खेळ दाखवत १०४ चेंडूत १०७ धावा केल्या. मात्र, महमुदुल्लाहची शतकी खेळी व्यर्थ ठरली. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर तब्बल १४९ धावांनी विजय मिळवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.