Maharashtra Live News Update : रवींद्र चव्हाण नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांचे अभिनंदन करणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६, राज्यातील २९ महापालिकांचा निकाल जाहीर, भाजपला स्पष्ट बहुमत, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

काका पुतण्याचं बिनसलं, आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत जिल्हापरिषदेला वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत?

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते,माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे आ.सावंत आणि धनंजय सावंत यांच्यामध्ये बिनसल्याचे चित्र दिसत आहे.

रत्नागिरी तालुक्यात 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी तालुक्यात 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रशासकीय यंत्रणा या ‘लोकशाहीच्या उत्सवा‘साठी सज्ज झाली असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मतदानासाठी रत्नागिरी तालुक्यात एकूण 271 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सखी‘ मतदान केंद्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केंद्रे आणि काही ‘आदर्श‘ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी एकूण 707 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली असल्याची माहिती जीवन देसाई यांनी यावेळी दिली...

दहावीच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र 20 जानेवारीपासून...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे....

शाळांनी या प्रवेश पत्रांची मुद्रीत प्रत विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य मंडळांनी दिले आहेत.

दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.

Maharashtra Live News Update : रवींद्र चव्हाण नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांचे अभिनंदन करणार

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण क्रिस्टल हाऊस येथे उपस्थित राहणार आहेत .

नवी मुंबई शहरामध्ये भाजपला बहुमतात महापालिकेची सत्ता मिळालेले आहे त्यामुळे भाजपचा महापौर होणार आहे या दृष्टीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे

नांदेडमध्ये भाजपाला बहुमत

नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली.. इतिहासात पहिल्यांदा नांदेड महापालिकेत भाजपाचा महापौर बसणार आहे.. महापालिकेच्या एकूण 81 जागांपैकी भाजपाने तब्बल 45 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली.अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेड महापालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. भाजपाने ही निवडणूक स्वबळावर लढली आणि जिंकली. त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले.

भाजपाने 45 जागा जिंकून सत्ता मिळवली .. मात्र यात नांदेडमध्ये एमआयएम पक्ष 14 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला , काँग्रेस वंचित युतीने 15 जागा जिंकल्या , तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला चार जागा , राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या.

मुंबई पुणे एक्सप्रेसवर 64 लाखांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त

रायगडच्या खालापूर पोलिसांनी गुटखा तस्करांविरोधात मोठी कारवाई करत 64 लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टोल नाक्या जवळ करण्यात आली आहे. या प्रकरणी शेख रशीद रहेमान आणि गणेश वानखेडे अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुटख्याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर आणि गुटखा मिळून 1 कोटी 3 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

दारु उधार न दिल्याच्या रागातून दारुड्याकडुन बीअरबारमध्ये तुफान हाणामारी

धाराशिवच्या परंडा शहरातील बीअरबारमधील घटना

बिअरबारचे मॅनेजर जनार्धन चंदर भोये व मालक बत्तीनी गौड यांच्यावर लाकडी काठी - कॅरेटने हल्ला,दोघे जखमी

मारहाणीची संपुर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद,चौघांविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल

बिअरबार मालक बत्तीनी गौड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्वास उर्फ बापु अंकुश भानवसे,रोहीत विश्वास भानवसे, महेश मच्छिंद्र भानवसे व अशोक मच्छिंद्र भानवसे यांच्याविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल

खोपोली उपनगराध्यक्ष पदी भाजपच्या विक्रम साबळे यांची बिनविरोध निवड

खोपोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे विराजमान झाले आहेत. पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले विक्रम साबळे यांना ही संधी देण्यात आली असून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. खोपोली नगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय..

16 जागेवर युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक आलेत निवडून..

रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थाना समोर मोठा जल्लोष..

युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांनी मतदारांचे मानले आभार..

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे पराभूत

अमरावतीच्या नवसारी प्रभागातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे पराभूत......

अवघ्या 27 वर्षीय भाजपचे उमेदवार ऋषिकेश देशमुख यांचा तब्बल 2200 मतांनी विजय....

राष्ट्रवादीसह भाजपने केली होती या ठिकाणी प्रतिष्ठेची निवडणूक...

माझी निवडणूक लोकांनी हातात घेतली म्हणून माझा विजय झाला विजयानंतर ऋषिकेश देशमुख यांची प्रतिक्रिया...

अमरावती शहरातील विकास कामे सीसीटीव्हीचा मुद्दा मार्गी लावणार..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com