Hardik Pandya Injury Update: इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळणार? दुखापतीबाबत समोर आली मोठी अपडेट

Hardik Pandya News In Marathi: हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaTwitter (X) Saam Tv
Published On

Hardik Pandya Injury Update:

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. न्यूझीलंडला धुळ चारल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

हा सामना येत्या २९ ऑक्टोबर रोजी लखनऊच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या करणार कमबॅक?

इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानूसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले की, 'ही किरकोळ दुखापत नाही. हार्दिक पंड्या लखनऊमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळू शकतो.' या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानूसार हार्दिक पंड्या फिट होऊन कमबॅक करू शकतो. त्यामुळे बीसीसीआय त्याची रिप्लेसमेंट शोधण्याच्या विचार करत नाहीये. हार्दिक पंड्या सध्या NCA मध्ये आहे.

Hardik Pandya
Shoaib Akhtar Statement: 'या मुलांना खायला,प्यायला अन् बोलायला शिकवा..', अख्तर आपल्याच खेळाडूंवर भडकला

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून झाला बाहेर...

बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्या गोलंदाजी करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याचा पाय मुरगळल्याने त्याला मैदान सोडावं लागलं होतं. मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आलं होतं. या कारणामुळे त्याला न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात खेळता आलं नव्हतं. (Latest sports updates)

Hardik Pandya
World Cup 2023: न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घेतली दलाई लामांची भेट! इंग्लंडविरूद्धच्या लढतीपूर्वी घेतले आशीर्वाद; Photo व्हायरल

न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले होते. हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं होतं. तर शार्दुल ठाकुरच्या जागी मोहम्द शमीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता.

नेमकं काय घडलं?

बांगलादेश संघाची फलंदाजी सुरु असताना भारतीय संघाकडून ९ वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला. त्यानंतर पुढील २ चेंडूवर बांगलादेशी फलंदाजांनी आक्रमण करत सलग २ चौकार मारले. षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर त्याचा पाय मुरगळला आणि तो जागेवरच पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com