Ruturaj Gaikwad saam tv
क्रीडा

IPL 2022: सचिनचा 'हा' विक्रम मोडणार?; ऋतुराज गायकवाडला इतिहास रचण्याची संधी!

साम न्यूज नेटवर्क

मुंबई - चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai super kings) स्टार सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल २०२२ च्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये सातत्याने अपयशी ठरला. मात्र सहाव्या सामन्यात त्याने लय प्राप्त केली. ऋतुराजने गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujrat titans) सामन्यात तुफान फटकेबाजी करत ४८ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. ऋतुराजचे फॉर्ममध्ये पुनरागमन ही चेन्नईसाठी (chennai super kings) दिलासा देणारी बाब असली, तरी त्यामुळे विरोधी संघाची चिंता वाढू शकते. गेल्या हंगामात सीएसकेला विजय मिळवून देण्यात त्याचे मोलाचे योगदान होते. ऋतुराजने मागच्या हंगामात ६०० हून अधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती.

ऋतुराजकडे सचिनचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

ऋतुराजला आता आयपीएलमध्ये महान क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकरला मागे टाकून अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. २५ वर्षीय ऋतुराजने आणखी ५३ धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा खेळाडू बनेल. सचिनने आयपीएलमध्ये ३१ डावात १ हजार धावांचा टप्पा पार केला होता. ही कामगिरी करणारा सचिना हा आयपीएल इतिहासातील एकमेव खेळाडू होता. मात्र आता सचिनचा रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी त्याच्याकडे आहे. ऋतुराजने आपल्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत २८ डावात ९४७ धावा केल्या आहेत.

IPL मध्ये सर्वात जलद १००० धावा करणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर : ३१ डाव

सुरेश रैना : ३४ डाव

देवदत्त पडिक्कल : ३५ डाव

ऋषभ पंत : ३५ डाव

रोहित शर्मा : ३७ डाव

आज चेन्नई विरुद्ध मुंबई महामुकाबला

गुरूवारी सायंकाळी चेन्नई सुपरकिंग्जचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर दोन्ही संघ एकमेकांना भिडतील. चेन्नईचा या हंगामातील हा सातवा सामना असून आतापर्यंत संघाने सहापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सला अद्यापही विजयाचे खाते उघडता आले नसून सुरूवातीच्या सहा सामन्यात त्यांच्या पराभव झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT