चेन्नईला दुसरा मोठा धक्का, मिल्ने संघातून बाहेर 'लिटील मलिंगा' संघात दाखल

मथिशा पाथिराना 2020 आणि 2022 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या संघाचा भाग होता.
Matheesha Pathirana
Matheesha PathiranaSaam TV

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जला (CSK) आणखी एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने (Adam Milne) या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत होता. अॅडम मिलनेच्या जागी सीएसकेने श्रीलंकेचा नवा गोलंदाज मथीशा पाथिरानाचा समावेश केला आहे. तो19 वर्षांचा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. पाथिरानाच्या गोलंदाजीची स्टाईल लसिथ मलिंगासारखीच आहे. या गोलंदाजाची स्टाईल आणि हातातून सुटणारा चेंडू मलिंगाप्रमाणेच आहे. त्यामुळे त्याला 'लिटिल मलिंगा' असेही म्हटले जाते.

मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana) 2020 आणि 2022 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. 2022 अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये त्याने चार सामन्यांत 27.28 च्या सरासरीने सात विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 6.16 होता. गोलंदाजीमध्ये तो चांगल्या वेगात गोलंदाजी करतो. तसेच यॉर्कर ही त्याची मोठी ताकद आहे. पाथिराना 20 लाखांच्या मूळ किमतीत CSK चा भाग बनला आहे.

पाथीराना सीएसकेच्या रडारवर होता

पाथीरानाने अद्याप वरिष्ठ स्तरावर सामने खेळलेले नाहीत. येथे त्याच्या नावावर लिस्ट ए आणि दोन टी-20 सामने आहेत. त्याला लिस्ट ए मध्ये एकही विकेट मिळालेली नाही, तर टी-20 मध्ये त्याला दोन बळी मिळवता आलेले आहेत. तो बराच काळ CSK च्या रडारवर होता. 2021 च्या हंगामापूर्वी, या संघाने महिष तेक्षानासह पाथिराना राखीव खेळाडू म्हणून त्यांच्यासोबत ठेवले होते.

केकेआरच्या सामन्यात मिल्नेला दुखापत

अॅडम मिल्ने हा न्यूझीलंडचा गोलंदाज आहे. तो IPL 2022 चा पहिला सामना खेळला होता. KKR विरुद्धच्या सामन्यात CSK ने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले. मात्र यादरम्यान त्याला दुखापत झाली. अॅडम मिल्ने या सामन्यात केवळ 2.3 षटके टाकू शकला. यानंतर तो तीन आठवडे बाहेर राहणार असल्याची बातमी समोर आली होती. पण आता तो आयपीएल 2022 मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे.

दीपक चहरच्या जागी चेन्नई सुपर किंग्जने अद्याप घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत सीएसकेमध्ये एक खेळाडूची कमी आहे. कोणत्याही आयपीएल संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असतात. यापैकी आठ परदेशी आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com