Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad Twitter
क्रीडा | IPL

Ruturaj Gaikwad Records: अहमदाबादच्या मैदानावर 'ऋतु'राज, शतक हुकलं मात्र 'या' मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

Ankush Dhavre

IPL 2023 GT VS CSK LIVE UPDATES: गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती.

प्रथम फलंदाजी करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. सुरुवातीला ३ फलंदाज बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने जबाबदारी स्वीकारली.

त्याने अवघ्या २३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

ऋतुराज गायवाकडने या सामन्यात २३ चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.

त्याने नवव्या षटकात २ गगनचुंबी षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.

ऋतुराजची विक्रमी कामगिरी..

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने या हंगामातील पहिली धाव, पहिला चौकार आणि पहिला षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स प्लेइंग ११ : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल,वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विलियमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ११: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

SCROLL FOR NEXT