sanju samson twitter
Sports

Sanju Samson: वैभव अरोराच्या रॉकेट बॉलवर संजू सॅमसनची बत्ती गुल! स्टम्प उडून पडला लांब

Sanju Samson Clean Bowled By Vaibhav Arora: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात संजू सॅसमन स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे.

Ankush Dhavre

गुवाहटीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघातील संजू सॅमसनला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. तो स्वस्तात बाद होऊन माघारी परतला.

या सामन्यात अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. राजस्थान रॉयल्स संघाकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. संजू सॅमसन सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसून आला. शेवटी वैभव अरोराच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित होऊन माघारी परतला.

तर झाले असे की, राजस्थान रॉयल्स संघाकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल स्ट्राईकवर असताना, चौथे षटक टाकण्यासाठी वैभव अरोरा गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर संजूने स्टेप आऊट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अंदाच चुकला आणि तो त्रिफळाचित होऊन माघारी परतला. संजू सॅमसनला ११ चेंडूत १३ धावा करत माघारी परतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाईट रायडर्स (Playing XI): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रामनदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

राजस्थान रॉयल्स (Playing XI): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश थीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT