गुवाहाटीच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला ६ धावांनी धूळ चारली. हा राजस्थान रॉयल्सचा या हंगामातील पहिला विजय ठरला. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला या हंगामातील तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी आपल्या फलंदाजी क्रमामुळे प्रचंड ट्रोल होतोय. गेल्या सामन्यात तो ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र या सामन्यात तो ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या. मात्र तो १६ धावांवर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान तो बाद झाल्यानंतर, सामना पाहण्यासाठी आलेल्या तरुणीने दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सच्या होम ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून नितीश राणाने केलेल्या ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ९ गडी बाद १८२ धावांचा डोंगर उभारला. चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावा करायच्या होत्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीवीर फलंदाज रचिन रविंद्र शून्यावर माघारी परतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीने २३ धावा चोपल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने या डावात ६३ धावा चोपल्या.
एमएस धोनी या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याच्याकडे संघाला विजय मिळवून देण्याची संधी होती. मात्र तो असं करु शकला नाही. सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी संदीप शर्मा गोलंदाजीला आला.
या षटकातील पहिल्याच चेंडूवर धोनीने मोठा फटका मारला. पण डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या शिमरॉम हेटमायरने डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. हा झेल टिपताच कॅमेरामनने कॅमेरा एका महिला फॅनकडे वळवला. त्यावेळी ती प्रचंड संतापात दिसून आली. तिने हात पुढे केला आणि मुठ आवळली. तिच्या रिअॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.