Rohit Virat and Gill saam tv
क्रीडा

रोहित, विराट ते गिल आले अन् गेले... टीम इंडियाचा वानखेडेवर फुसका बार, २९ धावात अर्धा संघ तंबूत; व्हाईट वॉशची नामुष्की

India vs New Zealand 3rd Test: न्यूझीलंडने भारतासमोर जिंकण्यासाठी १४७ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे महत्त्वाचे फलंदाज फेल गेल्याचं दिसून येतंय.

Surabhi Jagdish

वानखेडेवर सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर जिंकण्यासाठी १४७ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात टीम इंडियाच्या नाकीनऊ येताना दिसतायत. टीम इंडियाने सामन्यातील दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना ५ विकेट्स देखील गमावले आहेत. अवघ्या २९ रन्सवर टीम इंडियाने ५ विकेट्स गमावले आहेत.

सध्याच्या घडीला ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज या सामन्यातही फेल गेल्याचं दिसून आलं. कर्णधार रोहित शर्मा सोडून यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली आणि सरफराज खान यांनी दुहेरी धावसंख्याही गाठता आलेली नाही. रोहित शर्माने ११ रन्स करून पव्हेलियनमध्ये गेला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाचा सामना

न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 रन्सवर आटोपला होता. भारताकडून डावखुरा स्पिनर गोलंदाज रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतले. या सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने पहिल्या डावात 235 रन्स केले होते. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 263 रन्स केले. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला 28 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने आधीच ही सिरीज गमावली आहे. आता हा सामना जिंकून क्लीन स्वीप टाळायची संधी भारताकडे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी पात्रतेच्या दृष्टीनेही हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.

टीम इंडियाने गमावली सिरीज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना बंगळुरूमध्ये खेळवण्यात आला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमचा 8 विकेटने पराभव झाला. यानंतर दुसरा टेस्ट सामना पुण्यात खेळवला गेला. या सामन्यात देखील न्यूझीलंड ११३ रन्सने जिंकली. हा सामना जिंकत किवींनी अभेद्य आघाडी घेतली.

तिसऱ्या टेस्टसाठी दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेवोन कॉनव्हे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्क.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Athiya अन् KL Rahul च्या घरी येणार नवा पाहुणा, नवी वर्षात होणार आई-बाबा

Acer Tablets: एक नंबर! १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील टॅबलेट लॉन्च, जाणून भन्नाट फीचर्स किंमत

Vastu Tips: संध्याकाळी देवी लक्ष्मी येण्याची योग्य वेळ कोणती?

Viral Video: १२ सेकंदाचा थरार! ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, नेमकं काय घडलं?

Mumbai local update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

SCROLL FOR NEXT