India vs New Zealand squad  twitter
Sports

ROKO पुन्हा उतरणार मैदानात, गिलही करणार कमबॅक; न्यूझीलंडविरूद्ध 'या' १५ भारतीय शिलेदारांना मिळणार संधी

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दीर्घ विश्रांतीनंतर रोहित शर्मा पुन्हा मैदानात उतरणार असून, शुभमन गिल देखील संघात परतणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आता टीम इंडिया थेट पुढच्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार असून ११ जानेवारीपासून वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. २२ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात ३ वनडे आणि पाच टी-२० सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. अशावेळी वनडे टीमचा स्क्वॉड कसा असणार आहे ते पाहूयात.

गिलचं होणार कमबॅक

वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरूद झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये मानेला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये खेळू शकला नव्हता. त्यामुळे आता न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये गिलचं कमबॅक होणार आहे.

जर शुभमन गिल परतला आणि जयस्वी जयस्वालची वनडेसाठी निवड झाली तर त्याला प्लेईंग ११ मधून बाहेर ठेवलं जाऊ शकतं. जयस्वालने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ११६ रन्सची नाबाद खेळी केली होती.

कोणाला मिळणार टीममध्ये जागा?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं खेळणं जवळपास निश्चित मानलं जातंय. दोन्ही खेळाडूंनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली खेळी केली होती. विकेटकीपरमध्ये केल एल राहुलला पहिली पसंती दिली जाईल. त्यामुळे ऋषभ पंतला जागा मिळणं कठीण आहे. याशिवाय नुकतंच टी-२० वर्ल्डकपमध्ये सिलेक्ट केलेल्य इशान किशनलाही संधी मिळू शकते.

श्रेयस अय्यरला करणार कमबॅक

श्रेयस अय्यर खेळणार की नाही याबाबत अजूनही काहीही स्पष्ट नाही. न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजमध्ये त्याचं सिलेक्शन फिटनेसवर अवलंबून आहे. अय्यरला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये त्याला दुखापत झाली होती. हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडेमध्ये आराम देण्यात आला होता. त्यामुळे या सिरीजमध्येही त्यांना आराम दिला जाऊ शकतो.

रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांना खेळण्याची संधी मिळू शकते. प्रसिद्ध कृष्णाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात ४ विकेट्स घेतले होते. मात्र तो संपूर्ण सिरीजमध्ये महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागी सिराजला जागा मिळणार का हे पाहावं लागणार आहे.

न्यूझीलंडविरूद्ध कशी असेल टीम इंडिया

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kisanrao Hundiwale Case: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप

Maghi Ganpati 2026: माघी गणपती जयंती का साजरी करतात? जाणून घ्या पौराणिक कथा

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

Bridal Green Bangles Design: नववधूसाठी हिरव्या चुड्याच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, प्रत्येक साडीवर उठून दिसतील

Bread Dishes : ब्रेड पासून बनणाऱ्या झटपट 5 टेस्टी डिशेस

SCROLL FOR NEXT