
विराट कोहली-रोहित शर्मा वनडेमधूनही निवृत्ती घेणार?
ऑक्टोबरमध्ये दोघे शेवटचा वनडे सामना खेळणार?
मीडिया रिपोर्टमुळे क्रिकेट चाहत्यांचे टेन्शन वाढलं
Virat Kohli-Rohit Sharma Retirement : २०२४ चा टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारतच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोघांनी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली. ते दोघे फक्त वनडे फॉरमॅटमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी २०२७ च्या वर्ल्डकपमध्ये सामील व्हावे असे चाहत्यांचे मत आहे. पण चाहत्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे म्हटले जात आहे.
आशिया कपनंतर भारत ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रलिया दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका रोहित आणि विराट यांच्यासाठी शेवटची मालिका ठरु शकते असे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवट होऊ शकतो. जर दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरही वनडे फॉरमॅटमध्ये खेळायचे असेल, तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे लागेल. विजय हजारे ट्रॉफी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.
कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीनंतर सर्व भारतीय खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळावे असा बीसीसीआयने निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही २०२५ च्या सुरुवातीला रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
रोहित शर्मा-विराट कोहली या दोघांनीही भारतीय क्रिकेटमध्ये मौल्यवान योगदान दिले आहेत. पण आता निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन २०२७ च्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्डकपसाठीच्या रणनीतीमध्ये रोहित आणि विराट बसत नसून तरुण खेळाडूंना स्पर्धेसाठी संधी देण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. यामुळे ते दोघे २०२७ च्या वर्ल्डकपमध्ये सामील होणार नसल्याचे म्हटले जात आहे. याबाबत फक्त चर्चा सुरु असून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.