Rohit Sharma retires from test crickeT SAAM TV
Sports

Rohit Sharma: इंग्लंड दौऱ्यासाठी तयार होता रोहित; मग अचानक का घेतली निवृत्ती? 'हे' आहे कारण

Rohit Sharma retires from test cricket: बुधवारी संध्याकाळी रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला. इन्स्टाग्रामवर त्याने एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये रोहितने आपण टेस्ट क्रिकेटमधून रिटायर होत असल्याचं म्हटलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

Rohit Sharma retires from test cricket: बुधवारी संध्याकाळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या या निर्णयाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याचा शेवटचा टेस्ट सामना मेलबर्नमधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना होता. सिडनीमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी रोहितने स्वतःला टीममधून वगळलं होतं. इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये रोहित पुन्हा एकदा भारतीय संघाकडून टेस्ट क्रिकेट खेळताना दिसेल अशी अपेक्षा होती.

मात्र बुधवारी संध्याकाळी रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र रोहित शर्माने असा तडकाफडकी निर्णय का घेतला हे जाणून घेऊया.

मायकल क्लार्कची काय बोलला होता रोहित?

रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला Beyond23 क्रिकेट पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, "त्याने कोच आणि सिलेक्टरशी बोललो आहे आणि त्याबद्दल चर्चा झाली. मला स्वतःशी प्रामाणिक राहायचं होतं कारण त्यावेळी माझा खेळ चांगला नव्हता. टीमने संघर्ष करणाऱ्या खेळाडूंना वगळलं होतं म्हणून त्याला टीममध्ये राहायचं नव्हतं." भारत या पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच टेस्ट सिरीज खेळणार आहे. जी २० जूनपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे.

रोहित शर्मा आता टेस्ट क्रिकेट खेळणार नाही . बुधवारी त्याने चाहत्यांना त्याचा हा निर्णय सांगितला. क्लार्कशी बोलताना रोहित म्हणाला होता की, 'मी कोच आणि निवडकर्त्यांशी बोललो. यावरही काही भांडणंही झालं. मला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागलं. मी चांगले खेळत नसलेल्या खेळाडूंना वगळले होते म्हणून मला त्यावेळी टीममध्ये राहायचं नव्हतं.

रिटायरमेंटचा कोणताही प्लॅन नव्हता

ऑस्ट्रेलियामध्ये रोहितने निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं होतं. तो म्हणाला होता की, त्याला विश्वास आहे तो त्याचा फॉर्म सुधारू शकेल. सिडनीमध्ये स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित म्हणालेला की, 'मी इतक्या दूरवरून आलो आहे. मी इथे बाहेर बसण्यासाठी किंवा सामना न खेळण्यासाठी आलो नाहीये. मला खेळायचे आहे आणि टीमला जिंकवून द्यायचंय. २००७ मध्ये मी पहिल्यांदा ड्रेसिंग रूममध्ये आलो तेव्हापासून मी फक्त एवढाच विचार केला आहे की मला टीमला विजय मिळवून द्यायचा आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी तयार होता रोहित?

मायकेल क्लार्क त्याच्या पॉडकास्टमध्ये रोहितशी इंग्लंड दौऱ्याबद्दल बोलला होता तेव्हा रोहितला खेळायचं होतं असं वाटत होतं. मायकेल क्लार्कने रोहितला इंग्लंड दौऱ्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यामुळे या दौऱ्यासाठी रोहित तयार होता असं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT