suryakumar yadav with hardik pandya saam tv
Sports

Team India T20I Captain: सूर्या की हार्दिक? कर्णधारपदासाठी रोहितचा सपोर्ट कुणाला?

Suryakumar Yadav vs Hardik Pandya: रोहित शर्माने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धा ही रोहित धर्मासाठी टी -२० संघाचा कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा ठरली. ही स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यामुळे कर्णधारपदाची खुर्ची रिकामी झाली आहे. आता या पदासाठी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. दरम्यान सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी हार्दिक पंड्याचं नाव आघाडीवर होतं. मात्र आता गोष्टी बदलल्या आहेत.

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा पुढील कर्णधार होऊ शकतो. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी हार्दिक पंड्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्याकडे रोहितचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात होतं. मात्र फिटनेस आणि सतत संघाबाहेर ये जा सुरू असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली जाणार नाही.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की,माजी कर्णधार रोहित शर्मालाही सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून हवा आहे. या वृत्तात असंही म्हटलं गेलं आहे की, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकरांनाही सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून आहे. या दोघांनी याबाबत हार्दिक पंड्यासोबत चर्चा केली असल्याचंही म्हटलं जातं आहे.

भारतीय संघाने २०२४ टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाचं पुढील लक्ष्य टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा जिंकण्यावर असणार आहे. ही स्पर्धा भारतात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी भारतीय संघाची संघबांधणी सुरू आहे. त्यामुळे भारतीय संघाला पूर्णवेळ कर्णधार हवा आहे. सूर्यकुमार यादव श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचं नेतृत्व करेलच. यासह तो टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतही भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.

सूर्यकुमार यादव हा भारतीय टी -२० संघातील प्रमुख फलंदाज आहे. तर हार्दिक पंड्या प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. दोघांनाही नेतृत्वाचा अनुभव आहे. मात्र सूर्यकुमार यादवला अधिक संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT