Rohit Sharma  Twitter
क्रीडा

Viral Funny Video: तक-धिना-धिन-धिन, मैदानावर आक्रमक असणाऱ्या हिटमॅनचा मैदानाबाहेर दिसला मस्तीखोर अंदाज- VIDEO

Rohit Sharma Viral Video: या सामन्यापूर्वी रोहित शर्मा मस्ती करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

SRH VS KKR IPL 2023: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आतापर्यत ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. मात्र या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये.

या संघाला २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज मुंबईचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघासोबत रंगणार आहे. या समान्यपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार होऊ लागला आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणाऱ्या सामान्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ हैदराबादमध्ये दाखल झाला आहे. आज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडणार आहे.दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्मा मस्ती करताना दिसून आला आहे.

रोहित शर्माचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईचा आहे की हैदराबादचा हे माहित नाही. मात्र व्हिडिओ पाहून अंदाज येतोय की, मुंबईचा संघ एअरपोर्टला रवाना होताना दिसून येत आहेत. सर्व संघातील खेळाडू बसबसून बाहेर येताना दिसून येत आहेत. तिथे रोहित शर्मा देखील आहे.

त्याचवेळी Rohit Sharma एका व्यक्तीकडे जातो जो आपली बॅग सांभाळत असतो. त्यावेळी रोहित शर्मा जाऊन त्याच्या डोक्यावर तबला वाजवताना दिसून आला आहे. रोहित शर्मा ज्या व्यक्तीच्या डोक्यावर तबला वाजतोयय, त्याच्या डोक्यावर एकही केस नाहीये. त्यामुळे रोहित शर्मा त्याच्यासोबत मस्ती करताना दिसून आला आहे. (Latest sports updates)

आज हैदराबाद संघाविरुद्ध रंगणार सामना..

आज हैदराबादच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना जिंकणं मुंबई इंडियन्स संघासाठी कठीण असणार आहे. कारण सनरायझर्स हैदराबाद संघ सध्या जोरदार कामगिरी करतोय. मुंबईला जर हा सामना जिंकायचा असेल तर हैदराबाद संघातील फलंदाज हॅरी ब्रुक आणि राहुल त्रिपाठीला लवकर बाद करणं गरजेचं असणार आहे.

अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची संभावित प्लेइंग ११:

प्रथम फलंदाजी केल्यास- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फ.

प्रथम गोलंदाजी केल्यास- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्यामध्ये थंडीची चाहूल, पुढील दोन दिवस स्थिर तापमान

Public Holiday List: पुढच्या वर्षी सुट्ट्याच सुट्या! आत्ताच करा लाँग वीकेंडचं नियोजन, २०२५ मध्ये कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या?

Maharashtra Politics : कार्यकर्त्यांना हेच शिकवता? गद्दार म्हटल्यानंतर शिंदेंचा पारा चढला, थेट कार्यलात जाब विचारला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Success Story: कोण म्हणतंय लग्नानंतर करिअरला ब्रेक लागतो? घर आणि नोकरी सांभाळत UPSC क्रॅक; IPS तनुश्रीची यशोगाथा!

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

SCROLL FOR NEXT