Rohit Sharma Video Call Twitter/Mumbai Indians
Sports

Rohit Sharma Video Call: 'फॅमिली मॅन' हिट मॅन! सामना जिंकताच पत्नी रितिकाला केला Video कॉल, हटके स्टाईलमध्ये केला विजयाचा जल्लोष

Rohit Sharma Video Call To Wife Ritika Sajdeh: या विजयानंतर रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma IPL 2023: भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत होता. मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करत जोरदार कमबॅक केले आहे.

या खेळीच्या जोरावर त्याने मुंबई इंडियन्स संघाला जोरदार विजय मिळवून दिला. दरम्यान या विजयानंतर रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

रोहित शर्मासाठी कालचा दिवस अतिशय खास ठरला. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर रोहित शर्माला देखील २ सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

मात्र या सामन्यात रोहित शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ६५ धावांची खेळी केली आणि मुंबई इंडियन्स संघाला विजय देखील मिळवून दिला. या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी रोहित शर्माने आपली पत्नी रितिकाला व्हिडिओ कॉल केला.

या सामन्यानंतर रोहित शर्मा पत्नी रितिकासह व्हिडिओ कॉल वर बोलताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये हिटमॅन रितिकासह विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे. हा कॉल सुरु असताना दोघेही मजेशीर गप्पा मारताना दिसून आले आहेत.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून फलंदाजी करताना अक्षर पटेलने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली.

तर डेव्हिड वॉर्नरने ५१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटक अखेर १७२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने सर्वाधिक ६५ तर टिळक वर्माने ४१ धावांची खेळी करत हा सामना मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून जिंकून दिला. (Latest sports updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT